PHOTO: औरंगाबादच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याचे काम पूर्ण, लवकरच स्वारीचे आगमन! आमदार अंबादास दानवे यांची माहिती
औरंगाबादचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित अशा शिवाजी महापाजांच्या पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून छत्रपतींची ही शिल्पाकृती स्वारी लवकरच शहरात धडकणार असल्याची माहिती आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
औरंगाबादः अवघ्या औरंगाबादचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित, देशातील सर्वोच्च अशा शिवाजी महापाजांच्या पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून छत्रपतींची ही शिल्पाकृती स्वारी लवकरच शहरात धडकणार असल्याची माहिती आमदार अंबादास दानवे यांनी दिली. पुण्यातील स्टुडिओमध्ये भव्य पुतळ्याचे काम सुरू आहे. बुधवारी अंबादास दानवे आणि त्यांच्या टीमने त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील जुन्या पुतळ्याची उंची उड्डाणपुलाच्या तुलनेत कमी भासत होती. त्यामुळे येथे जुना पुतळा काढून नवा आणखी उंच पुतळा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे काम सुरु करण्यात आले होते. विशेष म्हणजे 21 फूट उंचीचा हा शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात मोठा अश्वारुढ पुतळा ठरणार आहे.
पुण्यातील धायरी येथे पुतळ्याची पाहणी
क्रांती चौकातील हा पुतळा घडवण्याचे काम पुण्यातील धायरी येथील चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ येथे सुसरु आहे. आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे आणि त्यांचे सहकारी हा भव्य पुतळा साकारत आहे. नुकतीच विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनी पुण्यातील या पुतळ्याचे काम कुठवर आले आहे, याची पाहणी केली. हे काम जवळफास पूर्ण झाले असून लवकरच शहरात तो कधी आणायचा, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अंबादास दानवे यांनी टीव्ही9 शी बोलताना दिली.
नव्या पुतळ्याची वैशिष्ट्ये-
औरंगाबादमधील क्रांती चौकात छत्रपतींचा हा सर्वात उंच अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याची उंची- 21 फूट लांबी – 22 फूट चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची- 52 फूट पुतळ्याचे एकूण वजन- 6 टन तसेच या पुतळ्याभोवतीच्या चबुतऱ्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
क्रांती चौक उड्डाणपुलाखाली शिवसृष्टी
बहुचर्चित अशा क्रांती चौकात लवकरच नवा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल. त्यासोबतच महापालिकेने या परिसरात आणखी एक मोठा प्रकल्प हाती घेतली आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून येथे शिवसृष्टी उभी करण्याचे काम सुरु झाले आहे. शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा यात समावेश असेल. या कामासाठी स्मार्ट सिटीतून 2 कोटी 60 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील या शिवसृष्टीद्वारे नागरिक आणि पर्यटकांना शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
इतर बातम्या-