औरंगाबादः महापालिकेच्या (Aurangabad municipal corporation) सिद्धार्थ उद्यानातील (Siddharth Garden) प्राणी संग्रहालयातील वाघ दत्तक देण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वाघासह प्राणी संग्रहलयातील (Zoo) इतर प्राणी दत्तक दिले जाणार आहे. म्हणजेच ज्या पालाकंनी हे प्राणी दत्तक घेतले आहेत, त्यांनी प्राण्यांच्या वर्षभरासाठीच्या देखभालीचा संपूर्ण खर्च करायचा आहे. या योजनेत वाघ, बिबट्या, कोल्हे, माकड, कासव आदी प्राणी दत्तक दिले जातील.
मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय म्हणून औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानाची ख्याती आहे. पर्यटन नगरी असलेल्या औरंगाबादमध्ये देश-विदेशातील लोक येत असतात. त्यांच्यासाठीदेखील औरंगाबादचे प्राणीसंग्रहालय हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळेच दररोज शेकडो पर्यटक या प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. इथे 14 वाघ असून बिबटे, कोल्हे, नीलगाय, सांबर, चितळ, माकड, कासव आदी 310 प्राणी आहेत. आता मनपाने या प्राण्यांसाठी दत्तक योजना आखली आहे.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि उपायुक्त सौरभ जोशी यांनी प्राणी संग्रहालयातील प्राणी हे शहरातील इच्छुक प्राणी, मित्र, व्यक्ती, संस्था व कंपन्यांना दत्तक दिले जाणार आहेत. प्राणी दत्तक योजनेची मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांचा वर्षभराचा खर्च द्यावा लागणार आहे. प्राणी दत्तक देऊन निधी उभारणे आणि त्याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवणे, हा यामागील हेतू आहे.
इतर बातम्या-