रिक्षाचालकाच्या मुलाचे नशीब रातोरात चमकले, DC ने करोडो रुपये खर्चून मुकेशचा टीममध्ये केला समावेश
मुकेश कुमार हा बिहारची राजधानी पाटणा येथील आहे. पाटणा पासून गोपालगंज जिल्ह्यातील काकरकुंड या छोट्याशा गावचा रहिवासी आहे.
मुंबई : नुकताच आयपीएलच्या मिनी लिलाव कोची येथे पार पडला आहे. या लिलावात जवळपास 80 खेळाडूंचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. त्यातील अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला विकत घेण्यासाठी स्पर्धा रंगली होती. या लिलावात मुकेशने त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये लावली होती, त्यामध्ये त्याला खरेदी करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडला आणि शेवटी मुकेश दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपये देऊन आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतले आहे. मुकेशचा शेवटचा आयपीएल सीझन यशस्वी ठरला होता. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. शुक्रवारी झालेल्या मिनी लिलावात मुकेश हा देशांतर्गत दुसरा सर्वात महागडा वेगवान गोलंदाज ठरला. शिवम मावीला त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. गुजरात टायटन्सने शिवमला 6 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
मुकेश कुमार हा बिहारची राजधानी पाटणा येथील आहे. पाटणा पासून गोपालगंज जिल्ह्यातील काकरकुंड या छोट्याशा गावचा रहिवासी आहे.
मुकेशला लहानपणापासूनच क्रिकेची आवड होती. पण त्याचे वडील त्याला खेळण्यापेक्षा अभ्यास करून करिअर करायला सांगायचे.
आपल्या आयुष्यातील गरीबी मुकेशने जवळून पाहिली आहे, गरीबी इतकी होती की कोलकाता येथे त्याचे वडील रिक्षा चालवत होते
याच दरम्यान मुकेश ला क्रिकेटची आवड लागली होती, त्यामध्ये हळूहळू तरबेज झाला होता. त्याच जोरावर तो बिहारच्या अंडर-19 टीममध्येही सहभागी झाला होता.
त्याच दरम्यान मुकेश सैन्य दलात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामध्ये मुकेशला तीनदा अपयश आले पण त्याच वेळी कोलकाता टीममधून तो क्रिकेट खेळू लागला आहोत.
मुकेशने रणजी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून भारताच्या अ संघात स्थान मिळवले होते त्यात दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात टीम इंडियात समावेश करत चमकदार कामगिरी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नसली तरी मुकेश देशांतर्गत केलेली खेळी कौतुकास्पद आहे. मुकेशने 12 धावा देत तीन बळी घेतल्याची जबरदस्त कामगिरी त्याच्या नावावर आहे.