अवधूत गुप्ते म्हणाले, आपकी बात ‘पटनी’ चाहीए, आदित्य म्हणाले, तुमची ‘दिशा’ चुकली!

अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्न तर विचारलेच पण वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली. अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना अभिनेत्री दिशा पटानीवरुन छेडलं.

अवधूत गुप्ते म्हणाले, आपकी बात ‘पटनी’ चाहीए, आदित्य म्हणाले, तुमची ‘दिशा’ चुकली!
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 2:01 PM

अहमदनगर : संगमनेरच्या अमृतवहिनी महाविद्यालयात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते (Aaditya Thackeray Disha Patani) यांनी घेतली. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्न तर विचारलेच पण वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली. अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना अभिनेत्री दिशा पटानीवरुन (Aaditya Thackeray Disha Patani) छेडलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब थोरात साहेबांचे आभार मानतो की तुम्ही हा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला. मी आदित्य संवाद कार्यक्रम सुरु केला, लोकांमधले प्रश्न विचारण्याचं धाडस वाढतं ते महत्वाचं आहे.कुठलाही प्रोटोकॉल मिळाला किंवा काढला तरी राहणं वागणं बदलू नका, असं आजोबा आणि वडिलांनी मला सांगितलं आहे. राजकारण्यांची खासियत दहा वर्षांपूर्वी बोललेलं आठवत नाही पण आम्ही महाविकास आघाडीत लक्षात ठेवतो”

आईचं नाव का घेतलं?

यावेळी अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना शपथविधीवेळी आईचं नाव घेण्यामागचं कारण विचारलं. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी शपथविधीवेळी आईचं नाव घेतलं ते नैसर्गिक आणि सहजपणे. आई-वडील दोघांनी आपल्याला मोठं केलेलं असतं. आई आपल्याला आजही ओरडा करते, ते प्रेमाने असतं. आई आपली काळजी घेते, म्हणून मी आईचं नाव घेतलं. आई सांगायची राजकारणात जाऊ नको, बाबा आहेत, आजोबा आहेत, पेपरात चांगलं येतं, वाईट येतं, हाऊसमध्ये जाण्याची हौस माझीच होती. आजोबा हे वेगळं व्यक्तिमत्त्व होतं, विचारांची पेरणी केली नव्या महाराष्ट्रात यशस्वी झालं. मागे कुणीतरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात असं म्हटलं. आधी सामाजिक फाळणी, पण शिवसेनेत जात धर्म आणि विभाग कधीही पहिला जात नव्हता. महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत”

दिशा पटानीबाबत

यावेळी अवधूत गुप्तेंनी विचारलं, आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. इतर नेत्यांवर सोडली आहे”.

त्यावर अवधूत गुप्तेंनी पुन्हा विचारलं, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए.  आपका उत्तर पटानी चाहीए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हणताच एकच जल्लोष झालं.  

आदित्य-दिशा पटानी

संबंधित बातम्या  

दिशा पटानीसोबत आदित्य ठाकरेंचा डिनर? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आज डिनर कुठे आणि कुणासोबत? दिशा पटाणीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे लाजले 

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.