बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे, बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला.

बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 7:14 PM

मोठी बातमी समोर येत आहे, माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सह्याद्री अतिथिगृहात उपमुख्यमंत्री एकाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला, दिव्यांगांच्या वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्यांचं मानधन वेळेत मिळत नाही. बाहेर राज्यात दिव्यांगांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत महाराष्ट्रात मिळणारं मानधन फारच कमी आहे, अनेक मागण्या पूर्ण होत नाहीत, असा आरोपही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? 

बाहेरच्या राज्यात दिव्यांगांना जे मानधन मिळतं त्या तुलनेत महाराष्ट्रात जे मानधन मिळतं ते फारच थोड आहे, आणि ते पण वेळेवर मिळत नाही. आम्ही दिव्यांगांसोबत बेईमानी करू शकत नाही. त्यांची भरती देखील होत नाहीये, त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. पदापेक्षा काम महत्वाचे असते, आम्ही काम करू, मी माझा राजीनामा दिला आहे. आमचं प्रेम हे सामान्य लोकांवर आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचं प्रेम आहे. उद्या याच मुद्द्यावरून आंदोलनाची वेळ येऊ शकते. आंदोलन करावं लागेल म्हणून माझी नैतीक जाबाबदारी म्हणून मी राजीनामा दिला.  नवीन नियुक्ती लवकर व्हावी अशी आमची इच्छा आहे, सरकार याबाबतचा निर्णय घेईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद देखील देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं, शिवसेनेच्या अनेक आमदारांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. बच्चू कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला  होता. मात्र  नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपद भेटलं नाही तर त्यांची नियुक्ती ही दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदावर करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत देखील बच्चू कडू यांचा यावेळी पराभव झाला, त्यानंतर त्यांनी आता आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.