Bacchu kadu : पालकमंत्री बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर, कथित रस्ता घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय?
अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा हा आरोप होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता व वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती.
अकोला : अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांना एक धडाडीचा नेता म्हणून पाहिले जाते. शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांसाठी भांडणारा नेता, रस्त्यावर उतरणारा नेते, व्यवस्थेशी झगडणारा नेता म्हणून बच्चू कडू हे नाव राज्याच्या राजकारणात मोठं झालं. त्यांचं साधं राहणीमान, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणं आणि गोरगरिबात वावरण त्यांना एक वेगळा मान मिळवून देऊन जातं. मात्र याच बच्चू कडुंच्या मागे आता पोलीस चौकशीचा (Akola Police) ससेमिरा लागला आहे. मात्र त्यांना कोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी तुर्तास तरी टळल्या आहेत. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज मजूर करत कोर्टाने बच्चू कडू यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.
बच्चू कडू यांच्यावर आरोप काय?
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांनी यासंदर्भात बच्चू कडूंविरोधात ही तक्रार दाखल केली होती. अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा हा आरोप होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता व वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले होते. त्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले, त्याच प्रकरणात बच्चू कडू यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.
बच्चू कडू यांच्याकडून आरोपांचे खंडन
मात्र याच प्रकरणात राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांचा तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले होते. त्यात शहरातल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 156/3 अंतर्गत 405, 409, 420, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पालकमंत्री बच्चू कडू यांनी या आरोपाच खंडण केले आहे. मी दोषी असेल तर वंचितच्या कोणत्याही नेत्यासमोर मी माझे हात कलम करीन असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिला असून, आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कडून ऍड. बि.के.गांधी यांनी अकोला जिल्हा सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असून त्यावर आज सुनावणी झाली असून जामीन मंजूर करण्यात आला असून पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार आहे.