दिन सबके आते हैं! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, बच्चू कडू महायुतीचा वचपा काढणार?

| Updated on: Jul 02, 2024 | 4:38 PM

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू हे महायुतीच्या नेत्यांवर चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत आपल्याला केवळ गृहीत धरण्यात आलं, आपल्याला विचारलं गेलं नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला होता. या सर्व राजकीय घडामोडींनंतर आता बच्चू कडू यांना महायुतीचा वचपा काढण्याची एक चांगली संधी चालून आली आहे. त्यामुळे बच्चू कडू आता काय भूमिका घेतात? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

दिन सबके आते हैं! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, बच्चू कडू महायुतीचा वचपा काढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, बच्चू कडू महायुतीचा वचपा काढणार?
Follow us on

विधान परिषदेच्या एकूण 11 जागांच्या निवडणुकीसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचं सध्याचं पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार जिंकून येऊ शकतात. पण महायुतीकडून या निवडणुकीसाठी 9 उमेदवार देण्यात आल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रहार जशक्ती पक्षाची बार्गेनिंग पावर वाढणार आहे. महायुतीचा 9 वा उमेदवार जिंकून यावा यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे बच्चू कडू या निवडणुकीत जायंट किलर ठरण्याची चिन्हं आहेत. बच्चू कडू आणि महायुतीमधील नेत्यांचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेल्याचं आपण बघितलं आहे.

लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या जागेवरुन बच्चू कडू आणि भाजप यांच्यात ठिणगी पडलेली आपल्याला बघायला मिळाली. मधल्या काळात बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत जातात की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली बघायला मिळाली. यानंतर आता बच्चू कडू यांची खरी ताकद आता विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसणार आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दोन बहुमुल्य अशी मते आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून बच्चू कडू महायुतीला लोकसभेतला वचपा काढणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

तर महायुतीचा 9 वा उमेदवार निवडून येणं अवघड?

विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत महायुतीने 9 उमेदवार दिले आहेत. महायुतीच्या मतांचा विचार केल्यास महायुतीचे एकूण 195 मतं होतात. यामध्ये अपक्षांची मते त्यांना मिळतील, असा महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे 9 उमेदवार निवडून येतील, असं त्यांचं म्हणणं आहे. पण 195 भागीले 9 केले तर 21 मते होतात. जिंकून येण्यासाठी 23 मते हवीत. ते होत नाहीत, पण 8 उमेदवार निवडून येऊ शकतात. 9 वा उमेदवार निवडून येण्यासाठी महायुतीला 12 मतांची गरज आहे. यामध्ये अपक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या 12 आमदारांमध्ये प्रहारचे दोन आमदार आहेत. बच्चू कडूंनी महायुतीचा वचपा काढला तर महायुतीचा 9 वा उमेदवार निवडून येऊ शकत नाही.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडू यांची भूमिका काय?

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांकडून प्रत्येकी तीन उमेदवार देण्यात आले आहेत. या तीनही उमेदवारांसाठी मतांचा कोटा हा पूर्ण आहे. तीनही पक्षांचं एकूण बलाबल पाहता तीनही पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रत्येकी 24 मते मिळू शकतात. त्यामुळे आता महायुतीच्या 9 व्या उमेदवारासाठी मोठी चुरस बघायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी विधान परिषद निवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार? याबाबत स्पष्ट उत्तर देणं सध्या तरी टाळलं आहे. आमच्या दोन्ही मतांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल घेणार, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय घडतं? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.