Bacchu Kadu | गद्दार म्हणा, टिंगल करा, कामातून उत्तर देऊ, बच्चू कडू यांचं वक्तव्य, मंत्रिपद मिळण्याची शक्यता?
उद्धव ठाकरेंविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले, 'उद्धव साहेबांसारखा सात्विक माणूस नाही निर्मळ भावनेतला माणूस आहे जे आजूबाजूने घेरले आहे.
मुंबईः ज्या लोकांनी मला निवडून दिलं आहे, त्यांना न्याय देण्यासाठी लोकांनी मला गद्दार म्हटलं तरी चालेल. त्याची पर्वा नाही. गद्दारीला आम्ही कामातून उत्तर देऊ, शब्दातून नाही, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिला आहे. काम आणि सेवेतूनच राजकारण करत राहणार असंही त्यांनी सुनावलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेल्या शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बच्चू कडू हेदेखील शिंदेंच्या गोटात शामिल झाले होते. शिंदे गटातील सर्व आमदारांना (Rebel MLA) गद्दार म्हटले जात आहे. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. या सर्वांवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसह अनेक आमदार फुटले असले तरीही उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये बच्चू कडू यांना महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूरतेच्या आधी काय घडलं?
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारलं तेव्हा ते आधी सूरतमध्ये गेले. यावेळचा प्रसंग सांगताना बच्चू कडू म्हणाले, ‘ खरं तर सुरत जायच्या आधी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांचा रिस्पॉन्स काही नव्हता. सूरतमध्ये आमदारांची संख्या पाहिली. 29-30 होती. तिथल्या आमदारांची मानसिकता परत येण्याची नव्हती सत्तातरानंतरच मातोश्रीवर जाऊ अशी भूमिका होती पहिल्या वाटला एकनाथ शिंदे बंद करत आहे पण प्रत्येक आमदारांच्या डोक्यात बंडाची प्रवृत्ती होती. सगळे विशेष व्यवस्था होती ती मनाला न पटणारी होती. दहा पंधरा दिवसात सत्ता आणि सत्य ची ताकद राजकारणात कशी वापरली जाते हे अनुभवलं. समीकरणे सगळे बदललेली आहेत सगळे व्यवस्था बदललेली आहेत….
येणारा काळ लहान पक्षांचा..
राज्यातील सत्तांतर आणि अपक्ष तसेच लहान पक्षांना आलेलं महत्त्व यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले,’ राजकारण आणि समाजकारण वेगवेगळ्या बाजू आहेत. 15- 20 वर्षात 300 गुन्हे माझ्यावर दाखल झाले. गेल्या 20 वर्षात सगळ अनुभवलं. व्यवस्थे सोबत भांडता भांडता व्यवस्था उभी केली पाहिजे , कार्यकर्ते सोबत राहतात सामन्यांना काही घेण देण नाही. मोठ्या पक्षमधे लागलेली चधाओढ पाहिली. येणारा काळ हा लहान पक्षांचा आहे झेंडा महत्त्वाचा नसतो अजेंडा महत्त्वाचा आहे. प्रहारचा अजेंडा हा सेवेचा आहे…
मंत्रिपदाबद्दल काय म्हणाले?
बड्डू कडू म्हणाले, ‘ बंडखोरी ही प्रत्येकामध्ये असते. बंडखोरी माणसाला जिवंत ठेवते. बंडखोर असणे महत्त्वाचा आहे. पहिलं बंड ज्ञानेश्वरांनी केलं. शरद पवारांनी 38 वर्षात 38 आमदार पाडले. बंडखोर कोण नाही विधानसभा अध्यक्ष सुद्धा बंडखोर बंडखोराचा सन्मान देशात नव्हतं जगात झाला आहे. बंडखोरीनंतर चांगली पदं भेटली पाहिजेत, बजेटचं पद भेटलं पाहिजे, जलसंपदा जलसंधारण भेटले पाहिजे असे लोक म्हणतात. आम्ही म्हटलं सामाजिक न्याय द्या. जिथे अपंग आणि दलित आणि सामाजिक काम करता आलं पाहिजे. नाही भेटलं पण तरीही पुन्हा त्या ताकतीने लढण्याची ताकद बच्चू कडू आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
‘उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही’
उद्धव ठाकरेंविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘उद्धव साहेबांसारखा सात्विक माणूस नाही निर्मळ भावनेतला माणूस आहे जे आजूबाजूने घेरले आहे. जितक्या ताकतीने ते मातोश्री वर काम करायचे त्या ताकतीने ते वर्षावरून काम करू शकले नाही. आघाडीचा धर्म ज्या पक्षांनी पाळायला पाहिजे होता आघाडीचा धर्म पाळला नाही सात्विकतेचा भाव होता तो इतर पक्षांनी मोडकडीस आणला.