बच्चू कडू यांचा मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पाठिंबा? बंडखोरी अन् लाडक्या बहीणींचं उदाहरण देत मोठं विधान

Bachhu Kadu on Maharashtra New CM : महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आलं आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची स्पष्टता आलेली नाही. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू यांचा मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पाठिंबा? वाचा सविस्तर बातमी? वाचा सविस्तर...

बच्चू कडू यांचा मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पाठिंबा? बंडखोरी अन् लाडक्या बहीणींचं उदाहरण देत मोठं विधान
बच्चू कडू, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:08 AM

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना निकाल लागून पाच दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये खल सुरु आहे. असं असतानाच आता महायुतीत दोन सुरु पाहायला मिळत आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं जात आहे. तर शिवसेना शिंदे गट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावं, अशी भूमिका मांडत आहेत. महायुतीतील मित्रपक्ष प्रहारचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे.

बच्चू कडू यांचा मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पाठिंबा?

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळेच मागे भाजप पक्ष सत्तेत आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल नसतं तर भाजप सत्तेत आलं असतं का? याचं सगळं श्रेय एकनाथ शिंदे यांना जातं. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर लाडकी बहीण योजना भेटली नसती. तुम्हाला एकनाथ शिंदेंमुळे ही योजना भेटली. म्हणून भाजपचे लाडके भाऊ आता सत्तेत आले आहेत. त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षित करता येणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

जातीचा आणि धर्माचा फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचं ठरला. धर्माचा झेंडा जिंकला आणि आमच्या सेवेचा झेंडा या निवडणुकीत हरला. झेंडे जिंकले, सेवा हरली…. कुठल्याही निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे.. EVM मध्ये पारदर्शकता नाही. जगातील सगळे देश बँलेट पेपरवर जर निवडणुका घेत असतील तर भाजप का म्हणत नाही आम्ही बँलेट वर घेऊ असं का म्हणत नाही?, असं बच्चू कडू म्हणालेत.

राणा दाम्पत्यावर बच्चू कडू यांचा निशाणा

विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू पराभूत झाले. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केला आहे. यावरून बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. मला पाडण्याचं श्रेय घेणाऱ्याना सांगतो की तुमची बच्चू कडूला पाडण्याची औकात नाही…तुम्ही म्हणाल तो मतदारसंघ तिथे मी उभा राहील… मला पाडण्याच जे श्रेय राणा घेत आहे पण त्यांची ती ताकद नाही… आम्ही आता मतदारसंघात प्रयोग करू…, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.