Akshay Shinde Encounter Hearing : गोळी डोक्यातच का मारली? पिस्तुल अनलॉक का होतं? मुंबई हायकोर्टाकडून प्रश्नांचा भडिमार, सरकारला उत्तर देताना नाकीनऊ

ही गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी चालली? गोळी डोक्यातून निघाल्यावर कुठे गेली? ती नेमकी कुठे लागली? या सर्वांचा एक फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करा, असे निर्देश कोर्टाने दिले.

Akshay Shinde Encounter Hearing : गोळी डोक्यातच का मारली? पिस्तुल अनलॉक का होतं? मुंबई हायकोर्टाकडून प्रश्नांचा भडिमार, सरकारला उत्तर देताना नाकीनऊ
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 2:23 PM

Akshay Shinde Encounter Hearing :  बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी नुकतीच पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने सरकारसह पोलिसांनाही खडे बोल सुनावले.

पिस्तुलचे लॉक उघडून ते लोड करून फायर केले का?

या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायमूर्तींनी आरोपीने पिस्तूल की रिव्हॉल्वर कशामधून गोळी मारली? असा प्रश्न विचारला. त्यावर सरकारी वकिलांनी पिस्तुल असे सांगितले. आरोपीने पिस्तुलचे लॉक उघडून ते लोड करून फायर केले का? असा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आला. त्यावर पिस्तुल कशी फायर केली याबाबतचे स्पष्टीकरण वकिलांकडून देण्यात आले. मात्र न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा बचाव नाकारला आहे.

सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही?

तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत, सर्वसाधारण व्यक्ती ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तुल फायर करू शकत नाही. सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही? तुम्ही कधी ते चालवलंय का? असा सवाल न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना विचारला. मी अंदाजे 500 राऊंड फायर केले आहेत. त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत, असे हायकोर्टाने म्हटले.

ही गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी चालली?

आरोपीने अचानक अधिकाऱ्याच्या कमरेत खोचलेलं पिस्तुल खेचलं आणि तीन राऊंड फायर केले, असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. या घटनेच्या वेळी त्या गाडीत चार पोलीस अधिकारी होते, जे पूर्णपणे प्रशिक्षित होते. त्यातील एक एन्काऊंटर केलेला पारंगत अधिकारी होता. यासर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तुल हिसकावू शकतो? हे समजणं थोडं कठीण आहे. ज्या अधिकाऱ्याने एन्काऊंटर केला तो कोणत्या बॅचचा होता. ही गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी चालली? गोळी डोक्यातून निघाल्यावर कुठे गेली? ती नेमकी कुठे लागली? या सर्वांचा एक फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करा. त्यावेळी वापरलेल्या शस्त्राचे फॉरेन्सिक रिपोर्ट केल्यानंतर यावर कारवाई केली जाईल.

या घटनेची चौकशी पूर्णपणे निष्पणक्षरित्या व्हायला हवी. कारण यात पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पण जर तपासात काही चुकीचे आढळले, तर मग आम्हाला कडक पावले उचावलाी लागतील. तसेच चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही. न्यायालयाची दिशाभूल सहन केली जाणार नाही, असेही कोर्टाने सांगितले.

पोलिसांवर संशय नाही पण याची योग्य चौकशी व्हायला हवी

प्रथमदर्शनी हा काही एन्काऊंटर नाही. पोलिसांवर संशय नाही पण याची योग्य चौकशी व्हायला हवी. तळोजा ते रुग्णालयातील सगळे सीसीटीव्ही फुटेज हवे. आरोपीचे फॉरेन्सिक ठसे हवेत. किती डिस्टेंसने गोळी झाडली, पॉईंट ब्लॅंकवर गोळी झाडली का, असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला.

अक्षय शिंदेंच्या डोक्यातच गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? आरोपीवर नियंत्रण का मिळवलं नाही, गोळी का मारली? 3 गोळ्या मारल्या, एक लागली, मग इतर दोन गोळ्या कुठे? 4 पोलीस एका आरोपीला कंट्रोल करु शकत नव्हते का? पोलिसांची पिस्तुल अनलॉक का होती? असा सवालही हायकोर्टाने उपस्थितीत केला.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.