अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यावेळी काय घडलं? वाचा A टू Z माहिती

या घटनेनंतर ठाणे पोलिसांकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली. यात त्यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यावेळी काय घडलं? याबद्दलची संपूर्ण माहिती दिली.

अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यावेळी काय घडलं? वाचा A टू Z माहिती
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 9:08 AM

Badlapur Akshay Shinde Encounter Details : बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ठाणे पोलिसांकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली. यात त्यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यावेळी काय घडलं? याबद्दलची संपूर्ण माहिती दिली.

ठाणे शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर एक प्रेसनोट जारी केली आहे. यात त्यांनी बदलापूर प्रकरणी आतापर्यंत काय काय घडलं? अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये काय झालं? त्याला रुग्णालयात दाखल केल्यानतंर पुढे काय घडलं? याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिस तळोजा कारागृहात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे (24) कलम 65(2),74,75,76 भा. न्या. संहिता सह कलम 4 (2),8,10 पोक्सो अॅक्ट तसेच गुन्हा रजि.नं 391/2024 कलम 65 (2), 74,75,76 भा. न्या. संहिता सह कलम 4(2),6,8,10,21(2) पोक्सो अॅक्ट या गुन्हयात अटक करण्यात आली होती. बदलापूर पूर्व पोलीस ठाणे रजि. नं 380/2024 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अक्षय शिंदे हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता. यानंतर कलम 377,324,323,504 भा.द.वि या गुन्हयाच्या तपासासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पथक हे ट्रान्सफर वॉरंट घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते.

अक्षय शिंदेने पोलिसांचे पिस्तुल खेचले अन्…

प्राथमिक माहितीनुसार काल संध्याकाळी 5.30 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ठाणे येथे घेऊन जात असताना संध्याकाळी 6.00 ते 6.15 दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले. यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने 2 राऊंड इतरत्र फायर केले.

जे जे रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन

यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली. ही गोळी आरोपी अक्षय शिंदेंला लागली आणि तो जखमी झाला. यानंतर पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदेला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी निलेश मोरे आणि इतर पोलिसांना पुढील तपासासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. तर आरोपी अक्षय शिंदेला मृत घोषित करण्यात आले. यानंतर अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नियमानुसार सर जे जे हॉस्पीटल मुंबई येथे करण्यात येणार आहे.

हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला...
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला....
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?.
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली.
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.