बदलापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट… पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलीसच बनले डमी आरोपी?; असं का केलं?

आरोपींच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी धक्काबुक्की करत चित्रीकरण करण्यापासून सुरुवातीला मज्जाव केला. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह २० ते २५ पोलिसांचा ताफा आरोपींच्या संरक्षणासाठी उभा करण्यात आला.

बदलापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट... पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलीसच बनले डमी आरोपी?; असं का केलं?
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 12:18 PM

Badlapur School Assault Case : बदलापुरातील एका नामांकित शाळेत अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेतील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला. आता याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल महिन्याभरानंतर पोलिसांनी या दोघांना कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून हे दोघेही पोलिसांना चकवा देत होते. या दोघांना नाट्यमयरित्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

बदलापुरातील नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिनाभरापासून पसार झाले होते. या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र १० सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला.

यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी १ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत पोलिसांच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले. “पोलीस आधीही चांगलं काम करत नव्हते आणि आताही चांगलं काम करत नाहीत. इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेच सापडतात, मग या प्रकरणात एक महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाहीत?” असा सवाल न्यायालयालने उपस्थित पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

यानंतर अवघ्या २४ तासात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांना अटक केली. यानंतर त्यांना आधी उल्हासनगरच्या एसीपी कार्यालयात नेण्यात आलं. तिथून मध्यरात्री १ वाजता त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं. यावेळी आरोपींच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी धक्काबुक्की करत चित्रीकरण करण्यापासून सुरुवातीला मज्जाव केला. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह २० ते २५ पोलिसांचा ताफा आरोपींच्या संरक्षणासाठी उभा करण्यात आला.

पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलीसच बनले डमी आरोपी?

ज्यावेळी या दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आलं, त्यावेळी पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी चक्क डमी आरोपी बसवून एक गाडी रुग्णालयात पाठवली आणि त्यानंतर मागच्या गेटने खऱ्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणलं. पोलिसांच्या गाडीत बुरखा घालून बसलेले डमी आरोपी हे दुसरे तिसरे कुणी नव्हे, तर खुद्द पोलीस कर्मचारीच होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनीच पत्रकारांना दिली.

उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्याने रुग्णालयात दाखल

यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत असे तब्बल ३ तास उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्याचं निदर्शनास आले. त्यांना मध्यवर्ती रुग्णालयातच पोलिसांच्या निगराणीत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तर तुषार आपटे यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. आज या दोघांनाही कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. उदय कोतवाल आणि तुषार आपटेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.