बाळासाहेबांनी आम्हाला ताकद दिलीय, गद्दार गँगला संपवणारच, शिवसेना नेता कडाडला
माझ्या मनात मी आमदार, मंत्री, नेता होईल असा विचार कधीच केला नाही. मी भाग्यवान आहे की मला ठाकरे घराण्याच्या तिसरी पिढीसोबत काम करण्याची संधी मिळाली. शिवसेनेत वय मोजले जात नाही. तुमचे काम मोजले जाते. जो काम करेल त्याला पुढचा रस्ता मोकळा आहे.

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विभाग क्रमांक 4, 5 आणि चांदिवली विधानसभेतर्फे शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सन्मान खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी 2024 पूर्वी नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा. कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत. मी सांगतो ते घडते. 4 नाही तर 400 गुजराती येऊ द्या, एक शिवसैनिक भारी पडेल. शिवसेना या महाराष्ट्राच्या मुंबईचे रक्षक आहे लक्षात ठेवा अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. तर याच कार्यक्रमात बोलताना नेते अनिल परब यांनी गद्दार गँगला संपवण्याचा काम शिवसेना नेता म्हणून माझ्याकडून प्रामाणिकपणे केलं जाईल. कुठल्याही गोष्टीची पर्वा करणार नाही, असा इशारा दिला.
जुहू येथे शिवसेनेचे नवनियुक्त पदाधिकारी आमदार अनिल परब, सचिव वरुण सरदेसाई आणि उपनेत्या राजुल पटेल यांचा सम्मान करण्यात आला. गौरव कार्याचा, सन्मान कर्तृत्वाचा सन्मान सोहळा अशा या सोहळ्यात नेते अनिल परब यांनी शिंदे गटाला इशारा दिला. खरं म्हणजे अशा प्रसंगी काय बोलावं हे अजूनही सुचत नाही. त्याचं कारण असं आहे की हा जो सत्कार आहे हा सत्कार माझा नाही. हा सत्कार या इथे बसलेल्या तमाम शिवसैनिकांचा आहे. ज्या शिवसैनिकांनी मला चार दशके साथ दिली असे ते म्हणाले.
मधुकर सरपोतदार यांच्यासारख्या जहाल नेत्याच्या हाताखाली मी काम केले. सर्वसाधारण मुलगा विभागप्रमुख, आमदार, मंत्री आणि नेता झाला. 20 वर्ष विभागप्रमुख होतो. माझ्या सोबत जे उभे राहिले. त्यांच्या सहकार्यामुळे मी इथवर पोहोचलो. शिवसेनेच्या कारकिर्दीत तुमचे काम काय? असे माल विचारले तर ९३ च्या दंगलीत जे ३५० शिवसैनिक अडकले होते त्यांना सोडविण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले.




माझ्या मनात मी आमदार, मंत्री, नेता होईल असा विचार कधीच केला नाही. मी भाग्यवान आहे की मला ठाकरे घराण्याच्या तिसरी पिढीसोबत काम करण्याची संधी मिळाली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तीन पिढ्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. ज्यांच्या हस्ते सत्कार झाला ते संजय राऊत यांच्यामध्ये राष्ट्रपती भवन हलविण्याची ताकद आहे असे ते म्हणाले.
राष्ट्रपती भवनात वाहन क्रमांक लिहिलेला नसेल तर आत प्रवेश दिला जात नाही. मात्र, आज संजय राऊत यांना राष्ट्रपती भवनात गाडीत पाहिले. त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला राष्ट्रपती भवनात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. ही ताकद महाराष्ट्राची आहे. राष्ट्रपती भवन हलविण्याची ताकद कुणामध्ये असेल तर ती संजय राऊत यांच्यामध्ये आहे असा किस्सा अनिल परब यांनी यावेळी सांगितला.
शिवसेना नेता म्हणून उद्धव साहेबांनी विश्वास दाखविला आहे. त्याला खोटे ठरवू देणार नाही. शिवसेनेत वय मोजले जात नाही. तुमचे काम मोजले जाते. जो काम करेल त्याला पुढचा रस्ता मोकळा आहे. एकेक जबाबदारी आता पुढची पिढी घेत आहे. कुठल्याही संघर्षाला कमी पडणार नाही. माझ्यातला शिवसैनिक मरू देणार नाही असे परब म्हणाले.
शिवसेना नेता म्हणून पक्षावर जर कुठले संकट आले तर त्या संकटाला समोर जाण्याचा पहिलं काम अनिल परब करेल. ती ताकद बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे. या गद्दार गँगला संपवण्याचा काम शिवसेना नेता म्हणून माझ्याकडंन अतिशय प्रामाणिकपणे केलं जाईल. कुठल्याही गोष्टीची पर्वा करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी शिंदे गटाला दिला.