केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही कोरोना लढ्यासाठी पैसे मिळेनात : बाळासाहेब थोरात

राज्याचे मसहूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत (Balasaheb Thorat on GST share of Maharashtra).

केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही कोरोना लढ्यासाठी पैसे मिळेनात : बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 4:19 PM

नवी दिल्ली : देशभरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मसहूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत (Balasaheb Thorat on GST share of Maharashtra). केंद्राकडे आमच्या हक्काचे 16 हजार कोटी रुपये थकीत आहेत. सध्या राज्यात कोरोना लढ्यासाठी या पैशांची गरज आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे या पैशांची मागणी केली जात आहे. मात्र, पैसे मिळत नसल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “कोरोनाच्या या संकटात राज्य सरकार सर्वोतरपरी प्रयत्न करत आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्व मंत्री आणि सर्वच सरकारी यंत्रणा राबत आहे, प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच काही प्रमाणात आपल्याला यश मिळालं हे नाकारता येणार नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे राज्य सरकार काम करत असताना केंद्राकडून असणाऱ्या काही अपेक्षा. आमच्या केंद्राकडून निश्चित काही अपेक्षा आहेत. यात राजकारण करायचं नाही, पण या अपेक्षा आहेतच. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या हक्काचा  जो वाटा आहे हो 16 हजार 656 कोटी रुपये इतका आहे. तो आम्हाला तातडीने मिळणं आवश्यक आहे.”

जीएसटीच्या वाट्या व्यतिरिक्त कोरोनाशी लढण्यासाठी आणखी निधी मिळणं आवश्यक आहे. पीपीई किट केंद्र सरकार पुरवणार असा निर्णय झाला आहे. केंद्र सरकारनेच तसं कळवलं आहे. मात्र, पीपीई किटच्या बाबतीत प्रचंड अपूर्तता दिसते आहे. जे रुग्ण आता तपासले जात आहेत किंवा ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत त्यांच्यासाठी पीपीई किट आहेत. परंतू नवीन जे रुग्ण येत आहेत, त्यांच्या तपासणीसाठी आणि उपचारासाठी संबंधित डॉक्टरांना देखील पीपीई किट देणं आवश्यक आहे. याबाबतीत देखील अपूर्तता दिसत आहे. ती पूर्ण केली पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

“वांद्रे येथील घटनेला केंद्राच्या संवादातील उणीवा जबाबदार”

वांद्रा येथे रेल्वेच्या बाबतीत संवादातील उणीवा पाहायला मिळाल्या. रेल्वे साडणार आहेत असा निर्णय झाल्याची बातमी आली आणि कालपर्यंत याची बुकिंग देखील सुरु होतं. ते बुकिंग अचानक थांबवणं त्या रेल्वे रद्द करणं यात संवादाची उणीव दिसते. वांद्र्याचा प्रसंग ओढावण्याचं कारण ते आहे. त्यामुळे याबाबत संवाद असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पंतप्रधान मोदींशी चर्चा करत आहेत. त्यांच्या सुचना घेत आहेत. मात्र, केंद्राकडून आम्हाला खूप मदतीची अपेक्षा आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

संबंधित बातम्या :

राजकारणात राजकीय संघर्ष नेहमीचा, कोरोनाचा पराभव हे आपले उद्दिष्ट : शरद पवार

मुंबईत नऊ वॉर्ड अतिगंभीर, ‘जी दक्षिण’मध्ये एका दिवसात 52 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंड

Balasaheb Thorat on GST share of Maharashtra

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.