नाव बदल हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील : बाळासाहेब थोरात
औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. Balasaheb Thorat Congress Aurangabad
औरंगाबाद : राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा पुढं आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. (Balasaheb Thorat said Congress not interested in name change of Aurangabad)
नाव बदल आमचा कार्यक्रम नाही
राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मी इकडे आलोय. शेतकऱ्यांना आम्ही मोठी मदत केली, चक्रीवादळात आणि अतिवृष्टीत आम्ही मोठी मदत केली. आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत. पण, भाजपला रोखण्यासाठी काही तडजोड करावी लागली तर विचार केला जाईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
आरोग्य यंत्रणा सक्षम करावी लागेल
2020 हे वर्ष खूप कठीण गेलं, कटू आठवणी आहेत. कोरोना संकट होतं पण आपण सामना केला. या वर्षाने खूप काही शिकवलं आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करावी लागणार आहेत. नव्या वर्षात मी सर्वसामान्यांची कामे करणार आहे. प्रकृती आणि मानसिकता शांत ठेवण्यासाठी प्रयत्न असेल. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्या योग्य पध्दतीने पार पडण्याचा प्रयत्न असेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
औरंगाबादच्या नामकरणाचा वाद
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.
Rajesh Tope | कोव्हिड संकटामुळे येत्या वर्षात आरोग्य क्षेत्रात भरती करणार : राजेश टोपे – tv9 @rajeshtope11 #NewYear2021 #Welcome2021 pic.twitter.com/3MlMg4erc4
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
संबंधित बातम्या:
औरंगाबादच्या नामकरणाचा पुन्हा वाद , MIMचं शिवसेनेवर टीकास्त्र
Subhash Desai | औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार, सुभाष देसाईंचं वक्तव्य
(Balasaheb Thorat said Congress not interested in name change of Aurangabad)