‘पंधरा मिनिटांचं एकच उत्तर…’, छत्रपती संभाजीनगरमध्ये लागलेल्या बॅनरनं खळबळ

छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात अज्ञात व्यक्तीकडून बॅनर लावण्यात आलं आहे, हे बॅनर चांगलंच व्हायरल झालं असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

'पंधरा मिनिटांचं एकच उत्तर...', छत्रपती संभाजीनगरमध्ये लागलेल्या बॅनरनं खळबळ
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 3:07 PM

निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून बॅनर लावण्यात आलं आहे, या बॅनरनं खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आलं आहे. या मतदारसंघात एमआयएम आणि भाजपमध्ये काटें की टक्कर आहे.

छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवर पंधरा मिनिटांचं एकच उत्तर शंभर टक्के मतदान असा मजकूर छापण्यात आला आहे. यातील पंधरा मिनिटांचं एकच उत्तर हे अक्षर हिरव्या रंगात छापण्यात आले आहेत, तर शंभर टक्के मतदान हे अक्षर भगव्या रंगात छापण्यात आले आहेत. या बॅनरमुळे या मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंधरा मिनिटांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांची काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सभा पार पडली. या सभेत देखील त्या पंधरा मिनिटांचा उल्लेख आला. त्यानंतर आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र हे बॅनर नेमकं कोणी लावलं याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

छत्रपती संभाजीनगरात अज्ञात व्यक्तीकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरनंतर या मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएमकडून इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपकडून अतूल सावे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या बॅनरमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.