Gold Purchase | दुकाने सुरु होताच बारामतीकरांची सराफा दुकानात गर्दी, एकाच दिवसात 30000000 रुपयांची सोने खरेदी
लॉकडाऊनच्या काळात तब्बल दोन महिन्यांनी सराफ बाजार उघडला आणि दुकानं सुरु होताच बारामतीकरांनी एकच गर्दी केली
बारामती : लॉकडाऊनच्या काळात तब्बल दोन महिन्यांनी (Baramati 3 Crore Gold Purchased) सराफ बाजार उघडला आणि दुकानं सुरु होताच बारामतीकरांनी एकच गर्दी केली. बारामतीत एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांचं सोनं खरेदी करण्यात आलं आहे. बारामतीत दुकानं सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल (15 मे) एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सराफ व्यावसायिकांनी दुकानं उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, लोक सोने खरेदी करणार नाहीत, असे सगळे अंदाज फोल ठरवत बारामतीकरांनी सोन्याची लयलूट केली आहे.
शेअर्समध्ये होणारे कमालीचे चढउतार, बाजारातील मंदीची परिस्थिती, बँकाच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बँकाबाबत निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना तसेच, लग्नसराईचा मोसम यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याचे काही सराफ व्यावसायिकांनी (Baramati 3 Crore Gold Purchased) सांगितले.
दुसरीकडे, लॉकडाउनमुळे लग्नाची पध्दतच बदलून गेली आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न होऊ लागल्याने इतर सर्व खर्च कमी झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पैसे लोकांनी सोन्यात गुंतविल्याचे बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.
नागपुरात एका दिवसात दारु विक्रीतून किती महसूल मिळाला? https://t.co/WNxmj0SAa1 @gajananumate
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 16, 2020
Baramati 3 Crore Gold Purchased
संबंधित बातम्या :
रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर, 24 तासात 32 पॉझिटिव्ह, कुठे किती रुग्ण?
Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, आकडा 360 वर
Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार