पुन्हा पवार विरुद्ध पवार… अजितदादांविरोधात घरातील ‘ही’ व्यक्ती लढणार?; सख्ख्या भावाचे संकेत काय?

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या. त्यानंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार लढत होणार असल्याचे बोललं जात आहे.

पुन्हा पवार विरुद्ध पवार... अजितदादांविरोधात घरातील 'ही' व्यक्ती लढणार?; सख्ख्या भावाचे संकेत काय?
शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 8:43 PM

Baramati Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, त्यानुसार राजकीय घडामोडींना वेगाने घडताना दिसत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. या अनुषंगाने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात नणंद आणि भावजय अशी लढत झाली होती. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या. त्यानंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार लढत होणार असल्याचे बोललं जात आहे.

लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आहे. हा मतदारसंघ बहुप्रतिष्ठित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. महायुतीकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांनी भाष्य केले आहे.

बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाई

“विधानसभा निवडणुकीची घोषणा ज्यावेळी होईल, त्यावेळी उमेदवार ठरेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. तर याच मतदारसंघात युगेंद्र पवार देखील काम करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते”, असा अंदाज अजित पवारांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला.

“अजित पवार हे बऱ्याचदा असे बोलत असतात. मी दिलेला शब्द पाळतो. फॉर्म भरायच्या वेळेस कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी फॉर्म भरत आहे, असं देखील दादा सांगतात. दादांनी म्हटलं आहे की मी देईल तो उमेदवार म्हणजे मीच होतो”, असा टोलाही श्रीनिवास पवार यांनी लगावला.

शरद पवारांचे ६० वर्षे बारामतीवर राज्य

“बारामती विकासाचा पाया शरद पवार साहेबांनी घातला ही वस्तूस्थिती आहे. पण शरद पवारांचा स्वभाव मी केलं, मी केलं हे सांगत फिरण्याचा नाही. शरद पवार यांनी बारामतीवर 60 वर्षे राज्य केलं. अजित पवारांना त्यांच्या एजनसीने सांगितलं आहे की तुम्ही शरद पवारांना गुरू मानत होता, त्यामुळे तुम्ही टीका करू नका. जितकी टीका कराल तेवढं तुमच्याविरोधात जात आहे. त्यामुळे दादांनी काही विषय भर सभेत न बोलता घरात बोलावेत”, असा सल्ला श्रीनिवास पवारांनी दिला.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.