Ajit Pawar : बारामती की शिरूर ? अजित पवार कुठून लढणार ? सस्पेन्स वाढला

आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या, असे ते म्हणाले होते. बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले होते. मात्र बारामतीमधून नव्हे तर मग अजित दादा कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

Ajit Pawar : बारामती की शिरूर ? अजित पवार कुठून लढणार ? सस्पेन्स वाढला
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 10:54 AM

लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आहे. बहुप्रतिष्ठित मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातूल लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात नुकतंच एक महत्वाचं विधान केलं होतं. आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या, असे ते म्हणाले होते. बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले होते. मात्र बारामतीमधून नव्हे तर मग अजित दादा कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

रिपोर्ट्सनुसार, अजित पवार हे यंदा बारामतीमधून नव्हे तर शिरूरमधून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवार शिरूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. म्हणून भाजपने या मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत. एक प्रकारे शिरूर मतदारसंघ हा अजित पवारांना सोडणार असल्याच्या चर्चा असून मात्र त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाल्याचे समजते.

निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू

अवघ्या महिन्याभरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुती-मविआकडून जागावाटपाच्या मुद्यांवर चर्चा सुरू आहे. तसेच मविआ, महायुती आणि सर्वच पक्षांकडून निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी मुलाखत घेण्यासाठीही सुरूवात केली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिरूर हा मतदारसंघ भाजपाकडे आहे मात्र तेथे अद्याप कोणत्याही उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची चर्चा आहे. पण अजित पवार गटाकडे सध्या तगडा उमेदवार नाही, त्यामुळे खुद्द अजित पवार हेच या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे नाव पुढे आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मात्र या संदर्भात अद्याप अजित पवार, राष्ट्रवादी किंवा महायुतीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजित पवारांची नक्की भूमिका काय, ते कुठून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतात हे प्रश्न अजून अनुत्तरितच असून सर्वांचे अजितदादांकडे लक्ष लागले आहे.

शिरूरमधून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्हकेट अशोक पवार विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे माजी आमदार (स्वर्गीय) बाबुराव पाचरणे यांचा पराभव केला होता. पक्षफुटीनंतर विद्यमान आमदार अशोक पवार हे शरद पवारांसोबतच राहिले. त्यामुळे यावेळीही महाविकास आघाडी कडून त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.