कोकण आणि बारसू प्रकल्पामुळे चर्चेत आलेलं कातळ शिल्प म्हणजे काय?

Barsu Refinery Project Scissors sculpture : मानवी उत्क्रांतीची साक्ष देणारी कातळ शिल्प रिफायनरीमुळे धोक्यात? वाचा सविस्तर वृत्तांत...

कोकण आणि बारसू प्रकल्पामुळे चर्चेत आलेलं कातळ शिल्प म्हणजे काय?
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 12:27 PM

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारसूत होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प सध्या चर्चेत आहे. हा प्रकल्प कोकणात व्हावा की नाही? यावरून सध्या वाद सुरू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आणि बाजूने आंदोलनं केली जात आहेत. अशात मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाची साक्ष देणारी कातळ शिल्प चर्चेत आली आहेत. राज ठाकरे यांनीही काल आपल्या भाषणात या कातळ शिल्पांचा उल्लेख केला आहे. ही कातळ शिल्प नेमकी काय आहेत? या कातळ शिल्पांवर रिफायनरी प्रकल्पाचा परिणाम होणार आहे का? जाणून घेऊयात…

कातळ शिल्प म्हणजे काय?

कोकणातील रत्नागिरी-राजापूर भागात कातळ शिल्प आढळतात. कोकणातील जांभ्या दगडावर ही कातळ शिल्प कोरलेली आहेत. प्राण्याची चित्र, मानवी आकृती, विविध भौमितिक आकार या खडकाळ भागावर आढळतात. थोडक्यात काय तर दगडावर कोरलेली चित्रं. पण चित्रं मानवी उत्क्रांती साक्ष देतात.

या कातळ शिल्पांमध्ये विविध आकार आढळतात. एक मोठा हत्ती अन् त्याच्या पोटात विविध प्राणी. हे चित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शिवाय गेंडा, पाणघोडा याचीही चित्र आढळतात. मुळात गेंडा आणि पाणघोडा हे कोकणात आढळत नाहीत. पण मग तरिही या प्राण्याची चित्रं कातळ शिल्पात कशी? हजारो वर्षांपूर्वी गेंडा, पाणघोडा कोकणात आढळायचे की हा मानव स्थलांतरित होता? असे अनेक प्रश्न या कातळ शिल्पांना पाहून उपस्थित होतात अन् हेच प्रश्न आपल्याला मानवी उत्क्रांतीच्या जवळ घेऊन जाणारे आहेत.

ऐतिहासिक ठेवा

कोकणात आढळणारी कातळ शिल्प जवळपास 45 हजार वर्षे जुनी असल्याचं बोललं जातं. जेव्हा गटागटाने राहणारा मानव स्थैर्याकडे वाटचाल करू लागला तेव्हाची ही कातळ शिल्प असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी मानव कसा राहत होता? तो कसा जीवन जगायचा? या सगळ्याचा उलगडा ही कातळ शिल्प करू शकतात.

कातळ शिल्पांना पाहून मनात उपस्थित होणारे अनेक प्रश्नच आपल्याला इतिहासाच्या जवळ घेऊन जाणार आहेत.

रिफायनरीचा कातळ शिल्पांवर परिणाम होणार?

कोकणात रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाय स्थानिकही या प्रकल्पाला विरोध करत आहेत. कोकणातील पर्यावरणावर या प्रकल्पाचा परिणाम होईल, असं म्हटलं जातंय. पण या प्रकल्पाचा कातळ शिल्पांवर परिणाम होईल का?

अभ्यासक काय म्हणतात?

जेव्हापासून हा प्रकल्प कोकणात होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तसंच त्याच्या परिणामांबाबत संशोधन केलं जात आहे. रिफायनरीचा परिणाम कातळ शिल्पांवर होणार की नाही? हे याबाबत चर्चो होतेय. कातळ शिल्पांवर या प्रकल्पाचा काय परिणाम होणार आहे? हे स्पष्ट झाल्या शिवाय या प्रकल्पाचं कामकाज पुढे नेऊ नये, असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे.

सरकारचं स्पष्टीकरण

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्प आणि कातळ शिल्प यांच्याबाबत स्पष्टकरण दिलं आहे. कातळ शिल्पांवर परिणाम होईल, असा कोणताही निर्णय सरकरा घेणार नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

ठेव्याची जपणूक

कातळ शिल्प केवळ कोकणच नव्हे तर मानवी उत्क्रांतीतील अत्यंत महत्वाचा दुवा आहे. त्याची जपणूक करणं गरजेचं आहे. शिवाय ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारी या कातळ शिल्पांवर संशोधन झाल्यास मानवी उत्क्रांतीची इतिहास समोर येऊ शकतो.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.