बीड जिल्ह्यातील 3 तालुक्यात कडक निर्बंध, तालुके कोणते, निर्बंध काय? वाचा सविस्तर
आष्टी, पाटोला आणि गेवराई तालुक्यांचा समावेश आहे. या 3 तालुक्यात सेवेची दुकानं फक्त सकाळी 7 ते 12.30 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. बीड जिल्ह्यातील 3 तालुक्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलीय. त्यात आष्टी, पाटोला आणि गेवराई तालुक्यांचा समावेश आहे. या 3 तालुक्यात सेवेची दुकानं फक्त सकाळी 7 ते 12.30 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे तिन तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Strict restrictions apply in Ashti, Patoda and Gevrai taluka)
राज्यातील बहुतांश भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. असं असलं ती बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्या मात्र कमी होताना दिसून येत नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बीडचा दौरा करत जिल्हा प्रशासनाला काही निर्देशही दिले होते. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा सातत्याने वाढत आहे. विशेषत: आष्टी, पाटोदा आणि गेवराई तालुक्यातील आकडे चिंताजनक आहेत. नागरिकांनी वेळोवेळी सांगूनही कोणत्याही फरक पडत नसल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आता नव्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.
काय आहे 3 तालुक्यांसाठी नियमावली?
आष्टी, पाटोदा आणि गेवराई तालुक्यात उद्यापासून सर्व दुकाने फक्त 7 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंतच राहणार आहेत. त्यामुळे दुपारी 1 नंतर नागरिकांनी फक्त अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यक कारणामुळे घराबाहेर पडल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय.
शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन दिवसांत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरु राहतील. या नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. बीड जिल्ह्यात गृह विलगीकरणाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण दर गृह विलगीकरणात असेल तर त्याबाबत स्थानिक प्रशासनाने योगी ती कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत.
शहरातील एखाद्या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Video : 10 th Result | 10 वीची वेबसाईट हॅंग प्रकरणी चौकशी समिती स्थापना करणार, वर्षा गायकवाड यांची माहिती https://t.co/kaNLeliDhD @VarshaEGaikwad @OfficeofUT @CMOMaharashtra #10thResult #Website #InquiryCommittee #VarshaGaikwad
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2021
संबंधित बातम्या :
Strict restrictions apply in Ashti, Patoda and Gevrai taluka