गुड न्यूज! बीड जिल्हा कोरोनामुक्त, आष्टीतील एकमेव कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह

बीड जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. यामुळे सर्व जिल्हावासियांचा जीव भांड्यात (Beed Corona Free District) पडला.

गुड न्यूज! बीड जिल्हा कोरोनामुक्त, आष्टीतील एकमेव कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 12:23 AM

बीड : लॉकडाऊन होऊन तब्बल एक महिना पूर्ण झाला (Beed Corona Free District) आहे. महिन्याभरापासून सर्वांचाच जीव टांगणीला लावणाऱ्या कोरोनापासून बीड जिल्ह्याला गुरुवारी (23 एप्रिल) मुक्तता मिळाली. आष्टी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा 14 दिवसानंतर दुसर्‍यांदा घेण्यात आलेला थ्रोट स्वॅब नमुना कोरोना रिपोर्ट नेगिटिव्ह आला. त्यामुळे बीड जिल्हा ग्रीन झोन मध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हावासियांना सुटकेचा निश्वास टाकला.

बीडमध्ये गुरुवारपर्यंत एकूण 170 थ्रोट स्वॅब नमुने तपासण्यात आले (Beed Corona Free District) होते. त्या सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी सकाळी नव्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात 2 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात 1 अशा तीन जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या तिघांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

तर अहमदनगरला उपचार घेणार्‍या बीड जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला फॉलोअप सॅम्पल निगेटिव्ह आढळून आला. त्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याचा तपासणीसाठी दुसरा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

त्याचा दुसरा रिपोर्टही कोरोना निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी हा अहवाल बीड जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. त्यामुळे बीड जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. यामुळे सर्व जिल्हावासियांचा जीव भांड्यात  पडला.

धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचे कौतुक

बीड जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे कौतुक केले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एकमेव रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. संयमी जिल्हा वासीयांचे, प्रशासनातील प्रत्येक घटकाचे करावे तितके कौतुक थोडे आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपण निर्णायक टप्प्यावर आहोत. हा शून्याचा आकडा टिकवायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे ट्विटही धनंजय मुंडे यांनी केले.

22 हजारावर ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल

राज्य शासनाने ऊसतोड मजुरांना स्वगृही पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऊसतोड मजुर जिल्ह्यात परतू लागले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत 22 हजार 510 ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल झाले. तर जिल्ह्यात सध्या 36 जण होम क्वॉॅरंटाईनमध्ये तर 312 जण संस्थात्मक अलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने (Beed Corona Free District) दिली.

पाहा व्हिडीओ :

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.