Beed | कॉलेज तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह, बीडमध्ये खळबळ, बाजूलाच पडली होती रिवॉल्व्हर!!

Beed Dead body Found | बीडमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला, मृतदेहाशेजारी रिवॉल्व्हरही आढळली

Beed | कॉलेज तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह, बीडमध्ये खळबळ, बाजूलाच पडली होती रिवॉल्व्हर!!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 2:56 PM

बीडः बीडमधील गुन्हेगारीच्या (Beed Crime) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आज आणखी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. शहरात सकाळच्या सुमारास एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळला. तरुणाचा चेहरा आणि शरीरावर जखमा आहेत. त्यामुळे त्याचा कुणीतरी खून केला असावा असा संशय येतोय. बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी (Postmortem) पाठवण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे या तरुणाच्या शेजारीच एक रिव्हॉल्वरदेखील सापडली आहे. याच रिव्हॉल्वरच्या मदतीनं तरुणाचा खून झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कुठे घडली घटना?

Beed Crime

बीड शहरातील बार्शी रोड लगत असलेल्या तिरुपती नगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेत ज्या तरुणाचा मृतदेह आढळला त्याचं नाव अक्षय भांडवले असं आहे. हा 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी होता. अक्षयचा मृतदेह आज सकाळी या परिसरात आढळल्यानंतर एकच खळबळ माजली. तरुणाच्या मृतदेहाच्या बाजूला रिवॉल्व्हर आढळल्यानेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

पोस्टमॉर्टेम अहवाल लवकरच

दरम्यान, मृताच्या चेहऱ्यावर रक्ताच्या जखमा दिसून आल्या. सदर घटनास्थळाचा अंदाज घेतल्यानंतर पोलिसांनी अक्षयचा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी सध्या हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. जिल्हा रुग्णालयातून अक्षयच्या पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट लवकरच मिळेल, त्यानंतर त्याचा खून झालाय का, याचं स्पष्टीकरण मिळेल. शिवाजीनगर पोलिसांकडून सदर प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, अक्षयचा मृतदेह सकाळीच अशा अवस्थेत सापडल्यामुळे बार्शी नाका परिसरात खळबळ माजली आहे. अक्षयच्या नातेवाईकांनाही या घटनेनंतर मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.