बीड जिल्हा बँक निवडणुकीत पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का, महाविकास आघाडीची सरशी

| Updated on: Mar 21, 2021 | 10:37 AM

बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालामुळे पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसला आहे. (Beed District Central Co-operative Bank Election)

बीड जिल्हा बँक निवडणुकीत पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का, महाविकास आघाडीची सरशी
Follow us on

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Beed District Central Co-operative Bank) निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसला आहे. बीडमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या अमोल आंधळे यांचा विजय झाला आहे. तर भाजपच्या धनराज राजाभाऊ मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. (Beed District Central Co-operative Bank Pankaja Munde Loss the election)

महाविकासआघाडीचा दणदणीत विजय

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमुळे राजकारण तापले होते. ही निवडणूक 20 मार्चला पार पडली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या आमोल आंधळे यांचा 223 मतांनी विजय झाला आहे. तसेच भाऊसाहेब नाटकर यांना 42 तर अपक्ष उमेदवार पापा मोदी यांना 92 मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या धनराज राजाभाऊ मुंडे यांना केवळ 9 मतं मिळाली आहे. तसेच बदामराव पंडित यांना 2 मते मिळाली आहेत.

त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालामुळे पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांना मात्र या निवडणुकीच चांगले यश मिळाले आहे. (Beed District Central Co-operative Bank Pankaja Munde Loss the election)

महाविकासआघाडीचे सहा उमेदवार 

महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. 20 मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व संचालक उमेदवारांची बैठक घेतली होती. महाविकास आघाडीमार्फत शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचा परिचय आघाडीतील सर्व तालुक्यातील प्रमुखांशी करून देण्यात आला. बीडमधील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक पार पडली.

पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकी संदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली. (Beed District Central Co-operative Bank Pankaja Munde Loss the election)

संबंधित बातम्या : 

बीड जिल्हा बँक निवडणूक, परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, पंकजा मुंडे घटनास्थळी

बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान; पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय, उद्या होणाऱ्या BDCC निवडणुकीवर बहिष्कार