बीड जिल्ह्याला उतरती कळा, पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीयाचा भाजपला रामराम, आरोप करत म्हणाले “गेली ६ वर्षे…”

बीड जिल्ह्यात भाजपला उतरती कळा लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे.

बीड जिल्ह्याला उतरती कळा, पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीयाचा भाजपला रामराम, आरोप करत म्हणाले गेली ६ वर्षे...
राजेंद्र म्हस्के
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 8:26 AM

Rajendra Mhaske Resign : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे तर काहींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र म्हस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात भाजपला उतरती कळा लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे.

“मी पक्षाचे कोणतेही काम करणार नाही”

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्याला सध्या उतरती कळा लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांनी काल बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. “गेल्या ६ वर्षांपासून मी भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. बीड विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळेल, याच अनुषंगाने माझे काम सुरु आहे”, असे राजेंद्र म्हस्के म्हणाले.

“आचारसंहिता लागली. दोन दिवसांनी फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. अशावेळाला पक्षातून कोणतीही विचारणा होत नाही. बैठका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष असूनही मलाच स्वत:ला नेमकं चाललंय काय असं विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी पक्षाच्या अनुषंगाने मी आज एक बैठक घेतली. त्या बैठकीत मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी पक्षाचे कोणतेही काम करणार नाही”, असे राजेंद्र म्हस्केंनी म्हटले.

विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न

“पदाचा सन्मान राखत पक्षासाठी मोठे परिश्रम घेतले. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर पक्ष नेतृत्वाने कामाची दखल घेतली नाही. उलट दुजाभाव केला. विरोधकांची मर्जी राखली. विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न झाले. सत्ता मिळूनही भाजपच्या निष्ठावंतांची गोची करण्याचे काम या अडीच वर्षांत झाले”, असेही राजेंद्र म्हस्केंनी म्हटले आहे.

लवकरच करणार शरद पवार गटात प्रवेश

राजेंद्र म्हस्के हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संपर्कात आहे. ते लवकरच शरद पवार गटाचे प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेंद्र म्हस्के यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार आहे.

Non Stop LIVE Update
जरांगे पाटलांचा अखेर राजकारणात प्रवेश, 'या' जागांवर देणार आपले उमेदवार
जरांगे पाटलांचा अखेर राजकारणात प्रवेश, 'या' जागांवर देणार आपले उमेदवार.
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....