बीड | 21 व्या शतकात एकिकडे जातीयता नष्ट करण्यासाठी मोठे प्रयत्न होत असताना तळागाळातील लोकांपर्यंत हे वारेही पोहोचले नसल्याचे चित्र दिसते. बीडमधील(Beed) केज तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. पारधी महिलेला (Pardhi woman) एका कुटुंबाने अत्यंत क्रूर वागणून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. केज तालुक्यातील हा प्रकार आहे. आदिवासी पारधी महिला आमच्या घरापुढून का जातेय, असे म्हणत सदर लोकांनी तिच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा आरोप महिलेने केला आहे. या कुत्र्याने महिलेच्या पायाचे अक्षरशः लचके (Dog bite) तोडले. त्यामुळे तिला खोलवर जखमाही झाल्या आहेत. सदर प्रकारानंतर महिलेने थेट पोलिसात धाव घेत कुटुंबातील लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या महिलेने केलेले आरोप पाहता, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी गावात ही घटना घडली. महिलेने पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहे. ती म्हणाली, सदर घरासमोरून मी जात होते. तेव्हा हे कुटुंब जेवायला बसले होते. मात्र आमच्या घरासमोरून का जातेय, असं म्हणत त्यांनी अंगावर कुत्रा सोडला, अशी तक्रार दिने केले. या कुत्र्याने महिलेच्या पायाला चावा घेतला. रवी गाताडे आणि अविनाश गाताडे अशी कुत्रा मालकांची नावे आहेत. तर जनाबाई काळे असं पीडित आदिवासी महिलेचे नाव आहे.
दरम्यान, पीडित महिला जनाबाई काळे यांना कुत्रा चावल्याने पायाला गंभीर जखम झाली आहे. या प्रकारानंतरही आरोपींना सदर महिलेच्या घरी जाऊन पोलिसात जाऊ नको, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिला काळेगाव इथली रहिवासी आहे. तिने केज पोलिसात यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, अशी मागणी तिने केली आहे. सदर प्रकरणी केज पोलीस तपास करत आहेत.
इतर बातम्या-