Beed | रिक्षा चालकावर वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला, बीडच्या पेठ भागात घटना
बीडः बीड शहरातील पेठ भागात एका रिक्षा चालकावर (Rikshaw Driver) वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला (Fatal Attack) झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षा चालक नेहमीप्रमाणे रस्त्यावरून जात असताना अचानक काही जणांनी त्याच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात (District hospital) उपचार सुरु आहेत. चालकावर झालेल्या […]
बीडः बीड शहरातील पेठ भागात एका रिक्षा चालकावर (Rikshaw Driver) वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला (Fatal Attack) झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षा चालक नेहमीप्रमाणे रस्त्यावरून जात असताना अचानक काही जणांनी त्याच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात (District hospital) उपचार सुरु आहेत. चालकावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
या घटनेनमुळे बीडमध्ये सध्या खळबळ माजली आहे. पेठ बीड भागात झालेल्या या हल्ल्यात रिक्षा चालक जखमी झाला आहे. सचिन सोनटक्के असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्याच्यावर वार केल्यानंतर सुरुवातीला कुणाला काही कळलच नाही. मात्र रिक्षा चालकाच्या गंभीर जखमा पाहिल्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती त्वरीत पोलिसांना दिली. सदर रिक्षा चालकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
केजमध्ये सराफा दुकान फोडून ऐवज लांबवला
बीडमधील अन्य एका घटनेत सराफा दुकान फोडण्यात आले. केज शहरातील पंचायत समितीच्या पाठीमागे उमरी रस्त्यावरील वीरा ज्वेलर्स हे दुकान फोडण्यात आले. चोरट्यांनी शटर तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील चांदीचे दागिने व इतर वस्तू असा एकूण 22 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 21 एप्रिल रोजी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गस्तीवर असलेल्या पोलिसांची गाडी पाहून पंचायत समितीकडून मांजरसुंबा रस्त्याने चोर पसार झाले.
इतर बातम्या-