Beed : धमक असेल तर स्वत:च्या गावात रस्ता आणाच, नाईकवाडेंचं संदीप क्षीरसागरांना आव्हान, जयदत्त क्षीरसागरांची शेरोशायरीतून टीका

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि शिवसेना नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. यंदा राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला लागले असून त्यांनी शिवबंधन बांधलं आहे. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी शेरोशायरीतून आमदार संदीप क्षीरसागरांवर टीका केली. तर नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे यांनी संदीप क्षीरसागरांना खुलं आव्हानच दिलंय.

Beed : धमक असेल तर स्वत:च्या गावात रस्ता आणाच, नाईकवाडेंचं संदीप क्षीरसागरांना आव्हान, जयदत्त क्षीरसागरांची शेरोशायरीतून टीका
राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला लागले,Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 10:00 AM

बीड : ‘आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी धमक असले तर किमान स्वत:च्या गावात रस्ता आणून दाखवावा’, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे यांनी दिलंय. मतदारसंघातील वयोवृद्ध लोकांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार संदीप क्षीरसागर शिवीगाळ करत असल्याचा आरोपही नाईकवाडे यांनी केलाय. याचवेळी शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) यांनी शेरोशायरीतून संदीप क्षीरसागरांवर टीका केलीय. ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागरांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या (Shivasena) गळाला लागले असून त्यांनी शिवबंधन बांधलं आहे. गंगाधर घुमरे, फारूक पटेल, नितीन लोढा, अमर नाईकवाडे आणि बाबूशेठ लोढा, अशी शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खरे आणि शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव उपस्थित होते.

काकांची शिरोशायरीतून टीका

‘सुबह का भूला शाम को घर आ जाए, तो उसे भूला नहीं कहते, असं शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर म्हणाले. प्रवेशाचा राष्ट्रीय महामार्ग सुरू राहील, असंही ते यावेळी म्हणालेत. दरम्यान, ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’, असं म्हणत त्यांनी आमदार संदीप क्षीरसागरांवर टीका केलीय. तर यावेळी बोलताना, कालिक मूह पे लगी है, आईने मे देख रहे है, असा टोला त्यांनी संदीप क्षीरसागरांना लगावलाय.

भारतभूषण क्षीरसागरांकडूनही टीका

पक्ष प्रवेशावेळी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनीही आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केलीय. ‘हे पाच पांडव आमच्या घरात होते. मात्र, आमचं घर फुटल्यानंतर ते त्या घरी गेले. आज पुन्हा आमच्या घरात आले. महाविकास आघाडी सरकार असताना केवळ शिवसेनेच्या नगरपरिषदेचा निधी देण्यात येत नाही. शिवसेनेचं काही चुकत आहे का? आम्ही आणलेल्या निधीचा इथले आमदार श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी 35 वर्ष नगराध्यक्ष आहे.  मी कधीच आमदार व्हायचं म्हंटलं नाही. पदासाठी रक्ताचं नातं तोडलं. माझ्यात विष कालविण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांचा हा जनसागर आहे. काकू नाना यांनी आम्हाला बेरजेचं राजकारण शिकविलं आहे.’ असंही नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यावेळी म्हणालेत.

योगेश क्षीरसागरांची टीका

यावेळी योगेश क्षीरसागर यांनीही आमदार संदीप क्षीरसागरांवर टीका केली. मागच्या निवडणुकीत लोढा परिवारने आमदाराला मदत केली. मात्र, त्यांनाही टक्केवारी मागितली. नारळ फोडण्याचं काम आमदार करतात, आमदार कलेक्शन करतात, असा आरोपही योगेश क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केलाय.

अमर नाईकवाडेंची टीका

आमदार संदीप क्षीरसागर यांनी धमक असले तर किमान स्वत:च्या गावात रस्ता आणून दाखवावा’, असं खुल आव्हान राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना दिलंय. मतदारसंघातील वयोवृद्ध लोकांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार संदीप क्षीरसागर शिवीगाळ करत असल्याचा आरोपही नाईकवाडे यांनी केलाय. यावेळी बोलताना नाईकवाडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला.

इतर बातम्या

‘महाज्योतीची’ महाफरफट ! समाजकल्याण विभागाने विभागीय कार्यालयासाठी जागा दिली अन लगेच काढूनही घेतली

kl Rahul captaincy: ‘या’ पनोतीपेक्षा ऋषभ, श्रेयस अय्यर दहापट चांगले’, लखनौच्या पराभवानंतर केएल राहुल वाईट पद्धतीने ट्रोल

Funny dance : यांना कोणीही आवरू शकत नाही! तरुणांच्या नृत्याचा हा Viral video पाहा आणि खळखळून हसा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.