बाबांनो मी आहे…आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाचे जरांगेंनी केले सांत्वन

मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी, कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याची मागणी कायम ठेवली आहे. जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले असून आता दसरा मेळाव्यासाठी समाजाच्या बैठका घेणे सुरु केले आहे.

बाबांनो मी आहे...आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या तरुणाच्या कुटुंबाचे जरांगेंनी केले सांत्वन
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 1:33 PM

मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही म्हणून बीड येथील एका तरुणाने आपले जीवन संपविले आहे. मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नाही सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणाने गळफास घेतला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी तरुणाच्या पीडीत कुटुंबियांची मनोज जरांगे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. आणि असे आततायी पाऊल न उचलण्याच आवाहन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलेले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. परंतू सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारच्या चालढकलीला कंठाळून मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणांना आज गळफास घेऊन जीवन संपविले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या पीडीत कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट घेऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

मराठा आरक्षणासाठी जीवन संपविणाऱ्या कवठेकर यांच्या कुटुंबाचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत सांत्वन केले. यावेळी पीडीत कुटुंबाल अश्रु अनावर झाले. यावेळी जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले की बाबांनो आत्महत्या करू नका मी आरक्षण देईन, असे आवाहन तरुणांना केले. कोणीही आत्महत्या करू नका मी आरक्षण देण्यास समर्थ आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. अर्जुन कवठेकर या तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जबाबदार आहेत. आता मी त्यांना सोडणार नाही.आता आरक्षण देत कसे नाहीत हे मी पाहतो.मात्र तरुणांनी आत्महत्या करून कुटुंब उघड्यावर आणू नये असे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी केले आहे.

दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा

दसरा मेळाव्याची पाहणी करण्यासाठी आपण जात आहे. गडाकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत, मेळाव्यासाठी लागणाऱ्या पार्किंगच्या जागेचे आणि दसरा मेळाव्याच्या मुख्य ठिकाणाची पाहणी करुन आपण आढावा घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन मराठा समाज दसरा मेळाव्याला येणार आहे. समाजामध्ये प्रचंड चिड आहे, आरक्षण बाबतीत सरकार दगा फटका करण्याच्या तयारीत आहे असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

विखे- पाटील यांच्याशी चर्चा

राधाकृष्ण विखे- पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. विखे-पाटील यांच्यासोबत सामाजिक,राजकीय,आरक्षण विषयावर चर्चा झाली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील यांच्या बाबतीत राधाकृष्ण विखे- पाटील यांनी मागे एक वक्तव्य केले होते की, जरांगे पाटील स्वतःचे आंदोलन स्वतः संपवतील. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की तुम्हाला उत्तर मिळाले आहे.संपणाऱ्याकडे कोणी जात नसते.त्या शब्दाचे उलट जर केले तर लक्षात येतंय संपायला कोण लागले आहे.

प्रसाद लाड यांच्यावर टीका

प्रसाद लाड काय बाजारात बैल विकणारा व्यापारी आहे का..? सर्व बोललो, त्याला माहित नाही का..? त्यांना भूकायला सांगितले आहे. आमच्या लोकांचे बलिदान जात आहे, आचारसंहिता लावली आणि निवडणूक घेतली तर सरकारला दाखवतोच असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.