संतोष देशमुखांना एक महिना आधी मिळालेली जीवे मारण्याची धमकी, पत्नीच्या जबाबतून धक्कादायक माहिती उघड
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या चौकशीला सध्या वेग आला आहे. नुकतंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे संतोष देशमुख अस्वस्थ होते. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. अपडेट होत आहे.