संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ‘तो’ आरोपी कुठे? पैसे आणण्यासाठी गुजरातहून निघाला पण…
आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन दिवस भिवंडीत होते. सुदर्शन घुले हा त्याच्या एका लहानपणीचा मित्राच्या घरी राहिलाच. तिथेच त्याने दोन दिवस वास्तव्य केलं.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे आणि डॉ. संभाजी वायभसे यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडी चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्यांचा ताबा sit कडे देण्यात आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानतंर हे तिन्हीही आरोपी भिवंडी परिसरात दोन दिवस वास्तव्यास होते. आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन दिवस भिवंडीत होते. सुदर्शन घुले हा त्याच्या एका लहानपणीचा मित्राच्या घरी राहिलाच. तिथेच त्याने दोन दिवस वास्तव्य केलं.
तीनही आरोपी गुजरातला मुक्कामी
यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणी फरार झाल्यानंतर हे तीनही आरोपी गुजरातला गेले होते. ११ डिसेंबरला भिवंडीतून गायब झाल्यानंतर या आरोपीनी गुजरात गाठलं होतं. गुजरातच्या टेकडीवर असलेल्या प्रसिद्ध अशा गिरनार मंदिरात आरोपींनी १५ दिवस मुक्काम केला होता. गिरनार मंदिराला जवळपास ११ हजार पायऱ्या आहेत. हे मंदिर प्रसिद्ध आहे. याच मंदिरात आरोपींची खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था झाली.
कृष्णा आंधळे कुठे?
यानंतर जवळचे पैसे संपल्याने आरोपी सुदर्शन घुलेने कोणाशी तरी संपर्क केला. आरोपी कृष्णा आंधळेला पैसे घेऊन येण्यासाठी मंदिरातून बाहेर पाठवलं. पैसे घेण्यासाठी गेलेला कृष्णा आंधळे परत न आल्यानेच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पैसे संपल्याने मंदिरातून बाहेर पडले आणि पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर बालेवाडी परिसरातून एका खोलीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे मात्र अद्याप फरार आहे.
सर्व माहिती पोलिस तपासातच उघड
यानतंर ते दोघे पुण्यात गेले. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमच्या बाजूला एका खोलीत ते राहत होते. यावेळी पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि त्या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतलं. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला बालेवाडीतून अटक करण्यात आली. दरम्यान यात आरोपींना फरार झाल्यानंतर कोणी, कोणी आसरा दिला. कोणी आर्थिक मदत केली, या सगळ्यांची चौकशी होणार आहे. डॉ संभाजी वायबसेना याने देखील पळून जाण्यात मदत केल्याचे आरोप होत आहेत. आता याबद्दलची सर्व माहिती पोलिस तपासातच उघड होणार आहे.