आधी भिवंडी, मग पुणे…; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कसा देत होते पोलिसांना चकवा?
सध्या Sit चे पथक आरोपींना घेऊन केजकडे रवाना झाले आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अजून फरार आहे. या दोन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या आणि टीप देणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्याभरापासून हे तिघेही फरार होते. त्यांचा शोध सुरु होता.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्यांचा ताबा sit कडे देण्यात आला आहे. सध्या Sit चे पथक आरोपींना घेऊन केजकडे रवाना झाले आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
भिवंडीत मित्राच्या घरी राहिले
त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या केल्यानतंर हे तिन्हीही आरोपी भिवंडी परिसरात दोन दिवस वास्तव्यास होते. आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन दिवस भिवंडीत होते. सुदर्शन घुले हा त्याच्या एका लहानपणीचा मित्राच्या घरी राहिलाच. तिथेच त्याने दोन दिवस वास्तव्य केलं. यानंतर पोलिसांना सुगावा लागला असता, त्यांनी या ठिकाणी धाव घेतली होती. मात्र त्यापूर्वी आरोपी पसार झाले.
पुण्यात होते वास्तव्याला
यानतंर ते दोघे पुण्यात गेले. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमच्या बाजूला एका खोलीत ते राहत होते. यावेळी पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला आणि त्या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतलं. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला बालेवाडीतून अटक करण्यात आली. दरम्यान यात आरोपींना फरार झाल्यानंतर कोणी, कोणी आसरा दिला. कोणी आर्थिक मदत केली, या सगळ्यांची चौकशी होणार आहे. डॉ संभाजी वायबसेना याने देखील पळून जाण्यात मदत केल्याचे आरोप होत आहेत. आता याबद्दलची सर्व माहिती पोलिस तपासातच उघड होणार आहे.