संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षकांचे महत्त्वाचे आदेश, म्हणाले “येत्या दोन दिवसात…”

नवनीत कॉवत हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत होते. नवनीत कॉवत यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच संतोष देशमुख प्रकरणी काही आदेश दिले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षकांचे महत्त्वाचे आदेश, म्हणाले येत्या दोन दिवसात...
santosh deshmukh
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 3:22 PM

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती. आता त्यांच्या जागी नवनीत कॉवत यांची बीड पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीड पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती होताच त्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सरकारची बाजू मांडली. त्यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याची आणि नवीन पोलीस अधीक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार, 24 तासात या पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत होते. नवनीत कॉवत यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच संतोष देशमुख प्रकरणी काही आदेश दिले आहेत.

“फरार आरोपींना लवकरच अटक करणार”

“सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. याप्रकरणी जे कोणी आरोपी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. येत्या दोन दिवसात मी पीडित देशमुख कुटुंबाला भेट देणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक कण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार आहेत. आता फरार आरोपींना लवकरच अटक होईल”, असे बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले.

“दहशत खपवून घेतली जाणार नाही”

“मी रात्री बीडमध्ये आलो आणि सकाळी रविवारीच्या दिवशी कामाला सुरुवात केली. पोलिसांना सुट्टी आणि रविवार नसतो. आता अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन मी सर्व निर्देश देणार आहे. बीड जिल्ह्यामधली दहशत खपवून घेतली जाणार नाही. बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे माझे पहिले कर्तव्य आहे”, असेही नवनीत कॉवत म्हणाले.

“कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही”

“बीडच्या नागरिकांनी दहशतीखाली वावरू नये. कुठलेही अडचण असल्यास 24 तास मला संपर्क करावा. बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसातच बीड जिल्हा हा गुन्हेगारीमुक्त करणार आहे. बीड जिल्ह्यात कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही”, असेही आदेश नवनीत कॉवत यांनी दिले.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....