7 जणांना मोक्का लागलाय, राहिलेल्या बोक्यालाही… सुरेश धस यांचा वाल्मिक कराडविरुद्ध निशाणा, मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

आता या प्रकरणावरुन भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. त्यासोबतच एक मागणीही केली आहे.

7 जणांना मोक्का लागलाय, राहिलेल्या बोक्यालाही... सुरेश धस यांचा वाल्मिक कराडविरुद्ध निशाणा, मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक
suresh dhas walmik karad
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 3:57 PM

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या आहेत. त्यातच आता नुकतंच याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे अशा ७ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आता या प्रकरणावरुन भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. त्यासोबतच एक मागणीही केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. आता सुरेश धस यांनी वाल्मिक कराडलाही मोक्का लावावा अशी मागणी केली आहे. आज धाराशिवमध्ये ते बोलत होते.

“मुख्यमंत्र्यांनी आमचं सर्व ऐकलं आता…”

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या मोर्चावेळी सुरेश धस यांनी जोरदार भाषण केले. या भाषणावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवरही मोक्का लावा, अशी मागणी केली. “ऍट्रॉसिटी दाखल करू नका म्हणून ज्या आकाने कॉल केला त्याला आरोपी करा. काही लोक आधी म्हणतात मी असं करेन, तसं करेन. पण जेव्हा बिन भाड्याच्या खोलीत गेले की सगळे गार होतात. मुख्यमंत्री साहेबांनी आमचं सगळं ऐकले आहे. मोक्का लावतो म्हणाले तो ही लावला. आता 7 जणांना मोक्का लागलाय, पण राहिलेल्या बोकाला पण मोक्का लागला पाहिजे”, असे सुरेश धस म्हणाले.

वाल्मिक कराडला ईडी नोटीस, सुरेश धस यांनी पेपर दाखवला

“या गुन्ह्यातील 7 आरोपींना अटक झाली आहे. एकाला अजून अटक झालेली नाही. एवढी भयाण परिस्थिती असूनही गुन्हे दाखल होत नाहीत. आकाने महासंस्कृती कार्यक्रम घेतला आणि 10 लाख खर्च केला. पण याचा खर्च 5 कोटी दाखवला. महासंस्कृती कार्यक्रमाचे टेंडर मुंबईच्या कंपनीला दिले होते. पण वाल्मिकने परभणीच्या मिनाज नावाच्या व्यक्तीला टेंडर दिले. अनेकजण म्हणतात की वाल्मिकला ईडीला नोटीस येत नाही. पण ही घ्या ती नोटीस… 2/2/2024 ची आहे”, असे म्हणत सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची ईडी नोटीस दाखवली

आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.