सर्वात मोठी बातमी, अखेर सुदर्शन घुलेला पकडला, आकाचे काय होणार?

बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीनपैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सर्वात मोठी बातमी, अखेर सुदर्शन घुलेला पकडला, आकाचे काय होणार?
santosh deshmukh murder case
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 10:27 AM

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. आता या तिन्हीही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील एकाला मुंबईतून तर दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे बोललं जात आहे. आता पोलीस यांना कधी अटक करणार, त्यांना कोर्टात कधी हजर केले जाणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सुदर्शन घुले ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार होते. सीआयडीकडून त्यांचा कसून शोध सुरु होता. सीआयडीचे वेगवेगळे पथक मुंबई, पुणे यांसह ठिकठिकाणी शोध घेत होते. आता याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनावणे यानेच सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. आता लवकरच बीड पोलीस अधिक्षक एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत पोलीस याबद्दलची सविस्तर माहिती देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने 100 पेक्षाही जास्त जणांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपींच्या फोनची कॉल हिस्ट्री, सीडीआर तपासला आहे. सीआयडीला आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून मोबाईलदेखील सापडले आहेत. त्या मोबाईलमधून व्हिडीओ देखील प्राप्त झाल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरीही तपासात आतापर्यंत काय-काय पुरावे मिळाले, याबाबत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत खुलासा होणार नाही.

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.