कमरे एवढ्या पाण्यात जलसमाधी, आंदोलक महिलेची अचानक तब्येत बिघडली; मस्साजोगचं वातावरण तापलं

बीडमधील मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कमरे एवढ्या पाण्यात जलसमाधी, आंदोलक महिलेची अचानक तब्येत बिघडली; मस्साजोगचं वातावरण तापलं
beed andolan
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 2:37 PM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात हजर केलं गेलं. त्यवेळी त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे याप्रकरणाचा पोलीस तपास वेगाने सुरु असताना दुसरीकडे आज बीडमधील मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २२ दिवस उलटले आहेत. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. आज सकाळीच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी मस्साजोग शिवारात उतरुन सामूहिक जल समाधी आंदोलन केले. या आंदोलनात गावातील महिला, लहान मुलंही सहभागी झाले होते. यावेळी जल समाधी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची प्रकृती खालवली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यानंतर बीडच्या पोलीस अधिक्षकांची नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जलसमाधी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी गावकऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी नवनीत कॉवत यांच्याकडे केली. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर गावकरी हे तलावातून बाहेर पडले.

दहा दिवसात फरार आरोपींना अटक करु, पोलिसांचे आश्वासन

फरार आरोपींना लवकरात लवकर अटक होईल, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दहा दिवसात या फरार आरोपींना अटक करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे. आमचा तसा प्रयत्न आहे. गावकऱ्यांना पोलीस संरक्षण आणि कुटुंबियांना वैयक्तिक संरक्षण दिलेले आहे. एसआयटीच्या बाबतीत शासनाने जी आर काढलेला आहे, त्याबाबत बसवराज तेली हे आयपीएस अधिकारी DIG रेजंचे अधिकारी आहेत त्याची प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे, अशी माहिती बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी दिली.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.