“जिरली का तुझी…”; या एका डायलॉगने पेटला कराड-गित्ते वाद, बीड कारागृहात नेमकं काय घडलं?
बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडली जात आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणीचा आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे बोललं जात आहे. बीड जिल्हा कारागृहात ही सर्व घटना घडली. याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहाने अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यानंतर महादेव गित्ते याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. आता याप्रकरणी एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे.
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. आता याप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीड तुरुंगात कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यातील राडा एका वेगळ्याच कारणाने झाल्याचे समोर आले आहे. बीड कारागृहातील राडा एकमेकांच्या टोळीवर कमेंट केल्याने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महादेव गित्ते, वाल्मिक कराड गँगच्या आरोपींकडून एकमेकांच्या जिरल्याची भाषा करण्यात आली. यामुळे हा राडा झाल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन टोमणे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव गित्तेच्या टोळीकडून वाल्मिक कराडच्या टोळीला बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन टोमणे मारण्यात आले. आता जिरली का? की अजून जिरायची आहे, असे टोमणे मारण्यात आले. यानंतर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांच्यात हाणामारी केल्याचे समोर आले आहे.
महादेव गित्तेचा दावा काय?
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केल्यानंतर लगेचच बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. महादेव गित्तेची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली आहे. मारहाण करून आम्हालाच छत्रपती संभाजीनगरला पाठवलं जात आहे. या प्रकरणात अक्षय भैय्याचा काहीही संबंध नाही, असं गित्ते याने म्हटलं आहे.