Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा पुरावा समोर, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन खुलासे झाले आहेत. आरोपी सुदर्शन घुलेने अपहरण आणि हत्येची कबुली दिली आहे. अपहरणासाठी वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून १९ पुरावे सापडले असून, फॉरेन्सिक अहवालात आरोपी सुधीर सांगळेचे फिंगरप्रिंट आढळले आहेत.

संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठा पुरावा समोर, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?
santosh deshmukh Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2025 | 3:33 PM

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी सध्या सीआयडी आणि एसआयटीची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले याने संतोष देशमुखांचे अपहरण करत हत्या केल्याची कबुली दिली आहे. सुदर्शन घुलेच्या जबाबानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी विविध तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. यात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. या वाहनामधून तब्बल १९ पुरावे आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.

संतोष देशमुखांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये अनेक पुरावे सापडले आहेत. आता पुरावे आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार स्कॉर्पिओ कारच्या काचांवर असलेले फिंगरप्रिंट्स हे आरोपी सुधीर सांगळेचे असल्याचे तपासात उघड झाले आहे.

स्कार्पिओ कारवरील फिंगरप्रिंट कोणाचे?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी काळ्या रंगाची स्कार्पिओ कार वापरण्यात आली आहे. तब्बल १९ पुरावे काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये सापडले असून वाहनावरील ठसे आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या कारच्या डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील काचेवर २ ठसे आढळून आले आहेत. हे फिंगरप्रिंट सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत, असा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोने दिला आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी सुदर्शन घुले याची आहे.

सुदर्शन घुलेच्या जबाबात काय?

तर दुसरीकडे आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर जबाबात संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली असल्याची कबुली दिली. आवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीत संरपंच संतोष देशमुख अडथळा ठरत होते. त्यादिवशी मित्राचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आम्हाला मारहाण केली. तसेच अपमानही केला. देशमुखांनी मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आम्हाला चॅलेंज दिलं होतं. या गोष्टीचा आम्हाला राग आला होता. त्यामुळे अपहरण करून देशमुख यांची हत्या केली अशी कबुली सुदर्शन घुलेने दिली.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.