“वाल्मिक अण्णा हा परळीचा देवमाणूस…” कराड समर्थक आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन
वाल्मिक कराड समर्थक राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून आक्रमकपणे आंदोलन सुरु केले आहे. वाल्मिक कराडचे समर्थक एका टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. यावेळी एका समर्थकाला भोवळ आल्याची घटना घडली आहे.
Walmik Karad Activist Andolan : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनीन घडामोडी घडत आहेत. काल संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान एका समर्थकाला भोवळ आल्याची घटना घडली आहे.
वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे सध्या बीडमधील परळीत वातावरण तापले आहे. त्यातच आज सकाळपासून वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहे. माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला सोडा. त्याचा याप्रकरणाशी काही संबंध नाही, असं पारुबाई कराड यांनी म्हटले. ‘माझ्या मुलाला न्याय द्या’ असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.
टॉवरवर चढलेल्या आंदोलकाला भोवळ
तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थक हे रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. वाल्मिक कराड समर्थक राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून आक्रमकपणे आंदोलन सुरु केले आहे. वाल्मिक कराडचे समर्थक एका टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. यावेळी एका समर्थकाला भोवळ आल्याची घटना घडली आहे. यावेळी इतर समर्थकांनी त्याला पाणी टाकून त्याला शुद्धीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
वाल्मिक कराड हा परळीकरांचा देवमाणूस
वाल्मिक अण्णाविरोधात आंदोलन करुन दबाव टाकून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते व्हायला नाही पाहिजे. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हायला हवी. खंडणीचा गुन्हा दाखल झालाय, तो तितकाच ठेवावा, विनाकारण दबावापोटी गुन्हे दाखल करु नये. आम्हालाही दबाव टाकता येतो. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे हे सर्वजण मिळून वाल्मिक कराडला टार्गेट करत आहेत. वाल्मिक कराड हा परळीकरांचा देवमाणूस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.
दरम्यानसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर तो मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. त्याला फक्त 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. अद्याप त्याला हत्या प्रकरणात आरोपी बनवलेलं नाही. हत्या प्रकरणात अटक झालेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडला हत्या प्रकरणात अटक करुन मोक्का लावावा, या मागणीसाठी काल धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं.