वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, धनंजय मुंडेंसोबतचा ‘तो’ व्हिडीओ समोर
वाल्मिक कराडने ऊसतोड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे.
Santosh Deshmukh Murder case : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहेत. सध्या वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे.
वाल्मिक कराडने ऊसतोड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसचा आहे. या व्हिडीओत १४४ हार्वेस्टिंग मालक, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटताना पाहायला मिळत आहे. या हार्वेस्टिंग मालकांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची सह्याद्रीवर भेट घेतली होती. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
वाल्मिक कराडची शेतकऱ्यांना मारहाण
त्यातच आता नुकतंच वाल्मिक कराडने ऊस तोडणी यंत्र मालकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाल्मिक कराडने ऊस तोडणी यंत्र मालकांना अनुदान देतो म्हणून सांगितले. मात्र अद्याप ते अनुदान दिले नाही. वाल्मिक कराडने १४० शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराडने कृषीमंत्री जवळचे आहेत म्हणून अनुदान मिळवून देतो, असे अमिष शेतकऱ्यांना दिले होते. मात्र अद्याप ते दिलेले नाही. तसेच अनुदान मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा आरोप काय?
वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे कृषीमंत्री आहेत त्यांच्याकडून सबसिडी घेऊया. सबसिडी जमा होण्याआधी ८ लाख आणि सबसिडी जमा झाल्यानंतर प्रत्येकी १ लाख रुपये असे द्या, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी धनंजय मुंडेही आले होते. त्यांनी तुमचं जे काही काम असेल ते करुन देतो. यानंतर ६ महिने त्याचा पाठपुरावा केला. ते आम्हाला सतत आश्वासने देत होते. या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही वाल्मिक कराडची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दोन शेतकऱ्यांना मारहाण केली, असा आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. यामुळे आता वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
पाहा व्हिडीओ :