Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed | सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

मयत ईश्वर वाघमारे यांनी सहकारी प्राध्यापकावर अनेक गंभीर आरोप केले असून मागील दोन वर्षांपासून लाखे हे त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे सूसाईड नोटमध्ये म्हटले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Beed | सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, बीडमध्ये खळबळ
बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:43 PM

बीड | सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळलेल्या शिक्षकाने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये (Beed suicide) उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी राहुल ईश्वर वाघमारे या शिक्षकाने (School teacher) आत्महत्या केल्याची घटना समोर आली. राहुल वाघमारे हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. आज सकाळी त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना आढळला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी (Beed police) घटना स्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास हाती घेतली. शिवाजी नगर पोलिस या प्रकरणी तपास करत असून त्यांना शिक्षकाच्या घरात एक सुसाइड नोटदेखील आढळली. त्यानंतर सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून सदर शिक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुसाइडनोटमध्ये गंभीर आरोप

या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल ईश्वर वाघमारे असं मयत शिक्षकाचे नाव आहे. बीडच्या पालवन चौक परिसरात ही घटना घडली. राहुल वाघमारे हे प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. आत्महत्या करण्यापूर्वी ईश्वर वाघमारे यांनी सुसाइड नोट लिहिली असून त्यात प्राध्यापक बाळासाहेब लाखे आणि त्यांचा सहकारी मुन्ना लोंढे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहचले असून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

प्राध्यापकांची चौकशी

दरम्यान, बीडमध्ये शिक्षकाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सहकारी प्राध्यापक बाळासाहेब लाखे यांची आता चौकशी सुरु आहे. मयत ईश्वर वाघमारे यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असून मागील दोन वर्षांपासून लाखे हे त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे सूसाईड नोटमध्ये म्हटले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

इतर बातम्या-

उदय सामंत यांच्याहस्ते ‘श्यामची आई’ सिनेमाच्या शूटिंगचा श्रीगणेशा, पावसमध्ये शुटिंगला सुरूवात

डेलीहंटची पेरेंट संस्था VerSe Innovation स्टार्टअपने रचला इतिहास, 5 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर विक्रमी 805 दशलक्ष डॉलर्स उभारले

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.