Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड जिल्हा कोणामुळे बदनाम झाला? अजितदादा पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,  टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बीड जिल्हा कोणामुळे बदनाम झाला? अजितदादा पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2025 | 8:57 PM

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,  टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या सर्व मुद्द्यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे, ते बीडमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

काही चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि नको तेवढी मोकळीक दिल्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला लौकिक मिळून द्यायचा आहे. बीडमधील विकृत लोकांना सरळ करणार म्हणजे करणार. कोणी कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कोणत्याही नेत्या जवळचा असो त्याला सरळ करणार म्हणजे करणार. नवीन पिढीला आवाहन करतो की आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे आजच्या लोकांकडून कळतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रसारमाध्यांचे देखील कान टोचले आहेत. वस्तूस्थितीला धरून बातम्या दिल्या पाहिजेत,  टी आर पी साठी कधी कधी बातम्या रंगवून सांगितल्या जातात, मात्र तसे करू नका. त्यामुळे एखाद्या शहराची बदनामी होऊ नये. बीड आणि बिडकरांची बदनामी थांबवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे.

ग्रामीण मराठी पत्रकारितेला एक विशेष परंपरा आहे. विविध लढ्यात पत्रकारितेचे मोठे योगदान आहे. ते टिकवले पाहिजे. मीडियाने वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगले म्हटलं पाहिजे. मीडिया ट्रायलमुळे एखादा माणूस आयुष्यातून उध्वस्त होतो.  AI चा वापर पत्रकारितेलाही केला पाहिजे. आता ते सगळ्या क्षेत्रात वापरले जाणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे, दरम्यान  बीड जिल्ह्यात शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर विमानतळ उभारणार असं अश्वासन देखीलअजित पवार यांनी यावेळी दिलं आहे.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....