“राज्याच्या सत्तासंघर्षाचं राजकारण अजित पवार यांच्याभोवती फिरत असतं”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं अजितदादांचं राजकीय वजन दाखवून दिलं
एकीकडे रिफायनरीचे आंदोलन चिघळले असताना दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी जाण्याच बेत आखला तर त्या आधी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण प्रदान कार्यक्रमामध्ये उष्माघाताने मृत्यू पावलेल्या लोकांविषयीही त्यांनी कुठेही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत.
बीड : राज्यात मुंबईसह विविध ठिकाणी भावी मुख्यमंत्री अजित पवार अशी बॅनरबाजी झाली असली तरी ती फक्त कार्यकर्त्यांची इच्छा नाही तर ती इच्छा महाराष्ट्राची असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज्याच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार असल्याचे सांगत थोड्याच दिवसात हे चित्र सत्यात उतरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याच्या कोणत्याही क्षेत्रात अजित पवार यांच्यासारखा नेता सहज आणि लिलया वावरत असतो. त्यामुळेच अशा नेत्याची मु्ख्यमंत्री म्हणून जर चर्चा होत असेल तर त्यात वावगं ते काय असा प्रतिसवाल आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
सामाजिक, राजकीय, सहकार आणि आर्थिक अशा विविध क्षेत्रातील अभ्यास आणि त्यांच्या ध्येयधोरणाविषयीची चर्चाही महाराष्ट्राने नेहमीच ऐकली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक माणसाला अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री होतीस असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
अजित पवार यांच्या नावाला समर्थन का मिळते या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यासारखा दुसरा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. राजकीय पकड, सामाजिक जाण आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याएवढी कोणत्याच नेत्यांमध्ये नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की,एकनाथ शिंदे यांना सध्या भाजपकडून तुम्ही कोणत्याही प्रकारची वक्तव्य करू नका अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहे.
तर दुसरीकडे राज्यात ज्या ज्या वेळी अडचणी येतील त्या त्यावेळी एकनाथ शिंदे भलत्याच कामात गुंतलेले दिसून आले आहेत.
एकीकडे रिफायनरीचे आंदोलन चिघळले असताना दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी जाण्याच बेत आखला तर त्या आधी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण प्रदान कार्यक्रमामध्ये उष्माघाताने मृत्यू पावलेल्या लोकांविषयीही त्यांनी कुठेही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत.
त्यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी होऊन ते थोड्याच दिवसात पायउतार होताना दिसून येतील असा टोलाही त्यांनी त्यांनी लगावला आहे.