Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Suspicious Bag : बीडमध्ये बस स्थानकात संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ

मराठवाड्यातील औरंगाबाद येथे आज मनसेची सभा आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच बीडच्या बसस्थानकात एक बॅग बेवारसपणे पडली असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर बॅगेत बॉम्ब तर नाही ना या कल्पनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि कल्लोळ माजला.

Beed Suspicious Bag : बीडमध्ये बस स्थानकात संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ
बीडमध्ये बस स्थानकात संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 5:08 PM

बीड : बीडमध्ये आज बस स्थानकात एक संशयास्पद बॅग (Suspicious Bag) आढळल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे बस स्थानक (Bus Depot) परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बॉम्बशोधक पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. सर्व परिसर खाली करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बॅग हाताळली. मात्र बॅग उघडून पाहिली असता बॅगमध्ये लहान बालकांचे कपडे निघाले अन् नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (An atmosphere of fear was created when a suspicious bag was found at a bus stand in Beed)

बॅगेत निघाले लहान बालकांचे कपडे

मराठवाड्यातील औरंगाबाद येथे आज मनसेची सभा आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच बीडच्या बसस्थानकात एक बॅग बेवारसपणे पडली असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर बॅगेत बॉम्ब तर नाही ना या कल्पनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि कल्लोळ माजला. तात्काळ पोलिसांना या बेवारस बॅगेबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. बसस्थानक परिसरातील लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. परिसर मोकळा बॅगेची तपासणी केली असता आता लहान बालकांचे कपडे निघाले. यानंतर नागरिकांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (An atmosphere of fear was created when a suspicious bag was found at a bus stand in Beed)

हे सुद्धा वाचा

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.