Crime : ज्या वेटरने जेवण वाढलं, त्यालाच पकडून 1 किलोमीटर फरफटत नेलं, बीडमधील धक्कादायक घटना समोर

Beed Crime : बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हॉटेलमध्ये ज्या वेटरने जेवण वाढलं त्यालाच बिल मागितलं म्हणून एक किलोमीटर गाडीला बांधून फरफरट नेलं. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Crime : ज्या वेटरने जेवण वाढलं, त्यालाच पकडून 1 किलोमीटर फरफटत नेलं, बीडमधील धक्कादायक घटना समोर
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 7:59 PM

कधी कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल काही सांगता येत नाही. हॉटेलमध्ये ज्या वेटरकडून जेवण वाढून घेतले त्यालाचा गाडीच्या बाहेर पकडून तब्बल एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत समोर घडलीये. वेटरला फरफटत नेत डोळ्याला पट्टी बांधत गाडीमध्येच ठेवलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी तेथे जेवण केले, त्यानंतर वेटर शेख साहिल अनुसूद्दीनला बिल घेण्यासाठी गेला. आरोपींनी त्याला फोन पे स्कॅनर घेऊन यायला सांगितला. ज्यावेळी वेटर स्कॅनर घेऊन गेल्यावर त्याला तिघांनी कशाचे बिल मागतो असं म्हणत वाद घालायला सुरूवात केली.

तू आम्हाला बिल का मागतोस का? म्हणत चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. हा सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. निर्जन ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी मारहाण करत वेटरच्या खिशातील 11 हजार 500 रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी शेख साहिल अनुसूद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून, सखाराम जनार्दन मुंडे आणि अन्य अनोळखी दोघांविरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अन्वये 140 (3), 119 (1), 115 (2), 351 (2),351 (3),281, 125 (ए), 3 नुसार दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.