Anjali Damania : समाजसुधारक वाल्मिक कराड…वाईन शॉपीचा बाजार, अंजली दमानियाचा मोठा गोप्यस्फोट, दारू गुत्त्यांचा काय आहे हा पॅटर्न

Anjali Damania on Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणीप्रकरणात वाल्मिक कराड कोठडीत आहे. त्याचे एक एक कारनामे बाहेर येत आहेत. आता अंजली दमानिया यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.

Anjali Damania : समाजसुधारक वाल्मिक कराड...वाईन शॉपीचा बाजार, अंजली दमानियाचा मोठा गोप्यस्फोट, दारू गुत्त्यांचा काय आहे हा पॅटर्न
अंजली दमानिया यांचा वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 10:58 AM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडचे बीड जिल्ह्यातील अनेक कारनामे समोर येत आहे. त्याची दहशत आणि प्रशासकीय यंत्रणेवरील त्याचा धाक यातून दिसून येतो. पोलीस यंत्रणेपासून महसूलपर्यंत सर्वच ठिकाणी त्याचा वचक असल्याचे दिसून येते. त्याच्याविरोधात कुणाचा ब्र काढण्याची हिंमत होत नव्हती हे समोर येत आहे. आता सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडचा वाईन पॅटर्न बाहेर काढला आहे. त्यावरून कायदा हे त्याच्यासाठी एक खेळण असल्याचे समोर येत आहे. काय आहे अंजली दमानिया यांचा दावा?

कराड याच्या नावावर पाच वाईन शॉप

हे सुद्धा वाचा

अंजली दमानिया यांनी बीडमधील वाईन शॉप पॅटर्न बाहेर आणला आहे. त्यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकाने आहेत. प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे.

ही जमीन केज येथे २९/११/२४ रोजी घेतली. त्यासाठी १,६९,००,००० रुपये मोजले. आणि ३ दिवसांत परवानगी दिली गेली. सात बारा १५ दिवसानंतर होतो. पण वाल्मिक कराडसाठी सगळे कायदे कसे धाब्यावर बसवले जातात, याचे हे एक उदाहरण असल्याच्या त्या म्हणाल्या. याविषयीचे एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी त्यांना मिळाले. त्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. याविषयीचे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.

अंजली दमानिया यांनी त्यांच्या मागण्या आणि पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिले. त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचे संबंध, पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, बिंदुनामावली, पवन चक्की यासंदर्भातील काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

जनाची नाही तर मनाची तरी..

यावेळी अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध, त्यांच्यातील व्यवहार यावर त्यांनी भाष्य केले आहे. इतके सर्व असून सुद्धा धनंजय मुंडे यांना जनाची नाही तर मनाचीही लाज वाटत नसेल की आपण राजीनामा दिला पाहिजे, तर अवघड आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा लढा द्यायला हवा, अशा त्या म्हणाल्या.

सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.