Beed | स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावरच अंत्यविधी, अंबाजोगाईतील चौथवाडी ग्रामस्थांची व्यथा
आज चौथवाडी ग्रामस्थांनी रस्त्यावर अंत्यविधी उरकला तरीही यापुढे एखाद्या मृतात्म्याची अशी परवड होऊ नये, यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बीड | अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील चौथवाडी गावातील लोकांना अद्याप स्मशानभूमीच (Cemetery) उपलब्ध झालेली नसल्याने संताप व्यक्त करत त्यांनी रस्त्यावरच अंत्यविधी उरकला. येथील माजी सरपंचांच्या मातोश्रींचं नुकतंच निधन झालं. अनेकदा मागणी करूनही ग्रामस्थांना स्माशनभूमी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. कुणाच्या शेतात तर इतरत्र अंत्यविधी केला जातो. आज अखेरीस या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत ग्रामस्थांनी रस्त्यावरच अंत्यविधी उरकला. जिवंतपणी पाणी, शिक्षण (Education), आरोग्य सुविधा, वीज आदी सुविधांसाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतो तर मरणानंतरही परवड सुरूच आहे, असेच चित्र येथे पहायला मिळत आहे.
चौथवाडीची व्यथा काय?
अंबाजोगाई तालुक्यातील चौथवाडी येथील येथे स्मशानभूमी नसल्याने माजी सरपंचांच्या आईचा अंत्यविधी रस्त्यावर उरकण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाले. स्वातंत्र भारतात आपण आज “आझादी का अमृत मोहत्सव ” साजरा आहोत. पण महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात पिण्याचे पाणी, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा, वीज, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने जिवंतपणी ग्रामीण भागातील ग्रामस्थाना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मरणानंतरही त्यांची परवड सुरूच आहे. त्यामुळे गावातून ग्रामस्थ शहराकडे स्थलांतर करत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील बाराशे लोकसंख्या व एकशे दहा घरे असलेल्या चौथेवाडी या गावात हटकर, मराठा, मातंग, बौद्ध, मुस्लिम समाजाचे घरे आहेत. स्मशानभूमीला जागा उपलब्ध होत नसल्याने एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास ज्याला बहुसंख्येने असलेल्या हाटकर व मराठा समाजातील ज्यांना शेती आहे त्यांचा अंत्यविधी शेतात करण्यात येतो. परंतु पावसाळ्यात शेतात अंत्यविधी करताना अंत अडचणीला तोंड द्यावे लागते. तर बौद्ध, मातंग समाजातील कुटुंबात शेती व स्मशानभूमी नसल्याने त्यांचा अंत्यविधी रस्त्यावर करावा लागतो. येथील माजी सरपंच लक्ष्मण मिसाळ यांच्या मातोश्री श्रीमती. धोंडाबाई रानबा मिसाळ (वय 90) यांचे स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर अंत्यविधी उरकण्यात आला.
स्मशानभूमी मिळावी, ग्रामस्थांची मागणी
दरम्यान, आज चौथवाडी ग्रामस्थांनी रस्त्यावर अंत्यविधी उरकला तरीही यापुढे एखाद्या मृतात्म्याची अशी परवड होऊ नये, यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
इतर बातम्या-