शिवरायांचा विचार, गोपीनाथ मुंडेंची आठवण, पंकजांचं कौतुक; धनंजय मुंडेंचं धडाकेबाज भाषण
Dhananjay Munde Dasara Melava Full Speech : बीडमधील भगवान भक्ती गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्यात मंत्री धनंजय मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं. या भाषणत धनंजय मुंडे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्ष केलं. वाचा सविस्तर बातमी...
बीडमधील भगवान गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या राज्यातील जेवढे महापुरुष, महंत, संत होऊन गेले. त्या महंतांनी, संतानी महापुरुषांनी जात पात धर्मासाठी काम केलं नाही. शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करण्यासाठी आठरापगड जातींना घेऊन राज्य उभं केलं. ते एका जातीचं राज्य नव्हतं. संत भगवान बाबांनी अध्यात्म शिकवला. तो कोणत्या एका जातीसाठी नव्हता. सर्वांसाठी होता. आज या दसऱ्या मेळाव्याला सर्व जाती धर्माचे लोक आले आहेत. इथे आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्माचा आहे. मला एकाने विचारलं, असं धनंजय मुंडे म्हणाले.
दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाले?
आपला मेळावा विचाराचा मेळावा आहे. भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळी १९६०ला तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला. गडाला नाव काय देऊ. तेव्हा चव्हाण म्हणाले, तुमच्या नावातच भगवान आहे. त्यामुळे गडाला भगवान नाव द्या. आमच्या नशिबात संघर्ष आहे. तुमच्या सर्वांच्या नशिबातही संघर्ष आहे. अशा संघर्षाच्या काळात आपण एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी सांगत आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
आता दसरा मेळाव्याची परंपरा फक्त बीड जिल्ह्यात नाही. संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा दसरा मेळावा आहे. एकनाथ शिंदे यांचा मेळावा आहे. बीड जिल्ह्यात संत भगवान बाबानंतर गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला आणि पंकजा मुंडेंनी सुरू केलेला हा मेळावा आहे. लोकशाही आहे. मला काही लोकांनी प्रश्न विचारले. मी म्हटलं आनंद आहे. दसरा का असावा. हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दसरा ज्याला माहीत आहे, त्याला प्रभू रामचंद्रही माहीत असावेत. प्रभू रामचंद्राशिवाय दसऱ्याचं महत्त्व नाही. त्यामुळे मी पुढचं काही बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या…, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
धनंजय मुंडेंची शेरोशायरी
तुम्हा सर्वांना सांगतो, या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. तरीही सांगतो, तुम्ही दोन्ही हातवर करून मुठी वळवा, आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत, एक आहोत, एक आहोत…, असं धनंजय मुंडे म्हणाले. त्यांनी पुढे एक शेर म्हटला…
“तुम लाख कोशिश करो, हमे हराने की,
हम जबजब बिखरेंगे, दुगनी रफ्तार से निखरेंगे”