‘त्या’ सगळ्यांना पाडा…; मनोज जरांगेंच्या मराठा समाजाला काय सूचना?

Manoj Jarange Patil on Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुणाला पाडायचं? याबद्दल मनोज जरांगेंनी भाष्य केलं आहे. त्यांनी मराठा समाजाला काही सूचना केल्या आहेत. वाचा सविस्तर...

'त्या' सगळ्यांना पाडा...;  मनोज जरांगेंच्या मराठा समाजाला काय सूचना?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 2:07 PM

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यांनी एकही उमेदवार दिलेला नाही. मात्र कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठं विधान केलं आहे. मी सरळ सांगतो तुम्हाला लिहून घेणे किचकट वाटले तर, सरळ ज्याला पाडावे वाटले तर पाडून टाका. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका, असं मनोज जरांगे म्हणाले. ते बीड जिल्ह्यातील गेवराईत स्थानिकांशी बोलत होते.

रपा रप पाडा- जरांगे पाटील

आम्हाला म्हणतात आमचे सरकार आल्यावर दाखवू. उभ्या रांगा धरून रपा रपा पाडा. लिहून घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अडचणीत येऊ नका. लोकसभेला सांगितले होते आणि आता पण सांगत आहे. पाडा पाडी करा. आता गरिबाला किंमत आली आहे, चपला सगट पाय पडत आहेत. मराठा आंदोलनाला गोरगरीब मराठा आणि ओबीसी मधील छोट्या छोट्या जातीला किंमत आली. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा, असं मनोज जरांगे म्हणाले.

म्हणून जरांगेंनी भाषण थांबवलं

मनोज जरांगे पाटील हे सध्या बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये आहेत. गेवराईमध्ये मनोज जरांगे यांच्या हस्ते त्यांचे समर्थक महेश दाभाडे यांच्या जनसेवा कार्यालयाचं उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी गेवराई तालुक्यातील मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरु करणयात आलं आहे. ऊर्जा मंत्री गेलेला आहे आणि त्याला मराठ्यांनी कचका दाखवला आहे. मला नाही वाटत तुम्हाला सांगायची गरज आहे. शिवरायांच्या काळात संकेतिक भाषा होती. आता ही पाडायचं कसं माहित आहे. भुजबळ यांना माहीत आहे जेलात कसे जायचे… कोणाला पाडायचे याबद्दल आता संभ्रमात राहू नका. आज प्रत्येक क्षेत्रातील मराठ्याला वाटते आरक्षणशिवाय पर्याय नाही. आपण निवडणूक न लढवायची योग्य वेळी योग्य भूमिका घेतली, असं मनोज जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगेंचं भाषण सुरु असतानाच अजाण झाली. त्यामुळे जरांगेंनी भाषण थांबवलं.

मनोज जरांगे काय म्हणाले?

आपण सर्व जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे. मराठा समाजाला वाटले तर उमेदवाराकडून लिहून घ्या व्हीडीओ करा. मी राज्यातील सर्व उमेदवार यांना ओळखत नाही. गावातील माणसाला वाटते कोण निवडून येणार आहे, त्याला निवडून द्या. नाही समजलं तर पाडून टाका. मी सरळ सांगतो तुम्हाला लिहून घेणे किचकट वाटले तर, सरळ ज्याला पाडावे वाटले तर पाडून टाका. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका. माझा हा राजकीय दौरा नाही, हा सामाजिक दौरा आहे. आपण आपल्या आंदोलनाची तयारी करू. आपल्याला सामूहिक उपोषण करायचं आहे, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.