साहेब, आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहोत…; विनायक मेटेंच्या जयंती दिनी पत्नीचं भावनिक भाषण

Jyoti Mete on Vianayak Mete Jayanti : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांची आज जयंती आहे. या निमित्त बीडमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. त्या काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

साहेब, आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहोत...; विनायक मेटेंच्या जयंती दिनी पत्नीचं भावनिक भाषण
ज्योती मेटे
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 6:48 PM

दिवंगत नेते विनायक मेटे यांची आज 61 वी जयंती आहे. या निमित्ताने बीडमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या कार्यक्रमाला राज्यातील कोणत्याही पुढाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. व्यासपीठावरील बॅनरवर मनोज जरांगे पाटील यांच्यासह ज्योती मेटे आणि शिवसंग्रामच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या अभिवादन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच मनोज जरांगे आणि ज्योती मेटे एका व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती ज्योती मेटे यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

वाढदिवसाच्या कार्यक्रमांची आठवण

दरवर्षी साहेबांचा वाढदिवस व्हायचा. मी खाली बसून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवायची. जवळपास 22 वर्षे हा प्रवास होता. मात्र दुर्दैवाने आज मला व्यासपीठावर येवून तुम्हाला बोलावे लागतंय. समाजात साहेबांनी चांगुलपणा पेरलेला आहे म्हणून कार्यक्रम सुरू असताना पाऊस आला आहे. आपल्या पतीबद्दल भूतकाळात जावून बोलणे हे कुठल्याही महिलेला आनंद देणारं नसतं. शेवटच्या श्वासापर्यंत ते समाजासाठी कमा करत होते. म्हणूनच आम्ही साहेबांची जयंती ही कृतज्ञता सेवा म्हणून साजरी केली आहे, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

विनायक मेटे साहेबांची कल्पकता आणि दूरदृष्टी प्रखर होती. बीड मधील एकाही लोकप्रतिनिधींनी विकासाकडे लक्ष दिले नाही. आपल्याला प्रस्थापिविरुद्धात संघर्ष करायचं आहे. साहेबांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसंग्रामला मोठे यश मिळाले आहे. आपण सर्व एकत्र येवून साहेबांची स्वप्नपूर्ती करूयात, असं म्हणत ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा दिली, असं त्यांनी म्हटलं.

ज्योती मेटेंचा कुणाला इशारा?

विनायक मेटेसाहेब आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहोत. साहेब तुमचे आमच्यावर आशीर्वाद आहेत. महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा शिवसंग्राम कडून पाच लाख रुपयांचा अपघात विमा उतरविण्यात आला आहे. जो येईल ते माझ्या सोबत असेल.. जे येणार नाहीत त्यांनी ठरवावं. शिवसंग्राम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची कार्यक्रमाला पाठ फिरविली आहे. त्यांनाच अनुसरून ज्योति मेटे यांनी हा इशारा दिला आहे. आजारी असल्याचे सांगत तानाजी शिंदे यांनी कार्यक्रमाला येणं टाळलं आहे. त्यांना ज्योती मेटे यांनी इशारा दिला आहे.

Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.